आजपासून गोंदियात लोकमत आपल्या दारी
By Admin | Updated: May 12, 2016 01:52 IST2016-05-12T01:52:06+5:302016-05-12T01:52:06+5:30
केवळ व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक वसा जोपासण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने

आजपासून गोंदियात लोकमत आपल्या दारी
समस्या मांडा : आम्ही येतोय आपल्या अंगणी
गोंदिया : केवळ व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक वसा जोपासण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने आता वेगवेगळ्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तडीस लावण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे या समस्या जाणून घेण्यासाठी आता ‘लोकमत चमू’ आपल्या परिसरात येणार आहे.
‘लोकमत आपल्या दारी’ नावाच्या या उपक्रमाची सुरूवात गोंदियात गुरूवार दि.१२ पासून केली जात आहे. सकाळी ८.३० वाजता कुडवा ग्रामपंचायत परिसरातील गजानन कॉलनीत असलेल्या गजानन मंदिराच्या प्रांगणात लोकमतची चमू दाखल होणार असून परिसरातील संपूर्ण नागरिकांनी, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी तसेच बालविकास मंचच्या सदस्यांच्या पालकांनी सकाळी ८.३० वाजता गजानन मंदिराच्या आवारात उपस्थित राहून आपल्या भागातील रस्ते, नाल्या, वीज, पाणी यासह इतरही समस्या मांडव्यात. त्या समस्यांना लोकमत मधून वाचा फोडून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमात परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसचिव, पोलीस पाटीलही सहभागी होऊ शकतात. (जिल्हा प्रतिनिधी)