आजपासून जिल्ह्यात बालस्वच्छता मोहीम
By Admin | Updated: November 13, 2014 23:04 IST2014-11-13T23:04:12+5:302014-11-13T23:04:12+5:30
स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शाळा व परिसरातील उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी,

आजपासून जिल्ह्यात बालस्वच्छता मोहीम
गोंदिया : स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शाळा व परिसरातील उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी, उपस्थिती, उपक्रमातील सहभाग व दर्जेदार शिक्षणात सकारात्मक बदलाच्या भूमिकेतून केंद्र सरकारच्या आदेशान्वये १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये बाल स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व मुख्यकार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसरामुळे प्रफुल्लित वातावरण निर्माण होऊन बालकांमध्ये आरोग्यविषयक चांगल्या सवयी रुजतील. आजारांचे प्रमाण कमी होईल, तसेच राष्ट्र विकासात व आर्थिक वृद्धीस हातभार लागण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करुन घेऊन त्यांच्या मतदारसंघात बालस्वच्छता मोहिमेंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्याची माहिती जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व मुख्य कार्यकारी अधिकाहरी डी.डी. शिंदे यांनी दिली.
बालस्वच्छता मोहिमेंतर्गत दि. १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत १४ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, क्रिडांगणे या ठिकाणच्या स्वच्छतागृहांची पाहणी व उद्घाटन करुन सर्व मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत सांगून स्वच्छता व आरोग्यविषयक शपथ देऊन शालेय स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आपे आहे. १५ नोव्हेंबर रोजी स्वच्छता व स्वच्छ आंगणवाडी उपक्रमांतर्गत शालेय परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. यावेळी मुख्याध्यापक मोहिमेचे व परीसर स्वच्दतेचे महत्व सांगणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी वैयक्तिक स्वच्दता आणि बाल आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबरला स्वच्दता अन्न दिवस साजरा करण्यात येऊन या अंतर्गत आरोग्य केंद्रास भेट देऊन आहार व आरोग्याची माहिती देण्यात येणार आहे. १८ रोजी पाण्याबाबत उद्बोधन, जलशुद्धीकरण केंद्रास भेट, पाणी स्वच्छतेचे स्टीकर तयार करणे, शाळेतील पाण्याच्या टाकीची स्वच्छता, अशुद्ध पाण्याचे परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १९ रोजी जागतिक शौचालयादिनी शौचालयाचा वापर व स्वच्दतेबाबत उद्बोधन, स्वच्छतागृह कसे असावे यावर चर्चा घडवविण्याच्या उपक्रमांचा समावेश आहे.
उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये बालकांना प्रोत्साहित व प्रेतिर कयन त्यांच्यामार्फत आसपासच्या प्रत्येक घरामध्ये स्वच्छताविषयक संदेश पोहचविण्यासाठी त्यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली जाणार आहे. प्रत्येक बालकास तीन ते चार कुटुंबांना भेटी देऊन त्यामधील सदस्यांना स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा याबाबत माहिती देण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. स्वच्छ भारताचे ध्येय साधण्यासाठी सुरु होत असलेल्या बाल स्वच्छता मोहिमेला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व सीईओ डी.डी. शिंदे यांनी केले आहे.