१६८४ शाळांत तंबाखूबंदी
By Admin | Updated: July 12, 2016 02:23 IST2016-07-12T02:23:39+5:302016-07-12T02:23:39+5:30
विद्यार्थी व्यसनाच्या गर्तेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया

१६८४ शाळांत तंबाखूबंदी
नरेश रहिले ल्ल गोंदिया
विद्यार्थी व्यसनाच्या गर्तेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात जिल्ह्यातील १ हजार ६८४ शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. तंबाखूच्या आहारी जाणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
कर्करोगासारखा असाध्य रोग या तंबाखूपासून जडत असते. तरीही टाईमपासच्या नावावर तंबाखूचे लागलेले व्यक्तीला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडते. तरीही गोंदिया जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या लाखावर आहे. येणारी पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने ७ नोव्हेंबर २०१५ ला पाठविलेल्या पत्रात शाळा तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गोंदियाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी प्रत्येक शाळांना पत्र पाठवून तंबाखूमुक्त शाळा करण्यास सांगितले. त्यांच्या सुचनेनुसार गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८४ शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
या प्रत्येक शाळेच्या भिंतीवर तंबाखूमुक्त शाळा असे लिहीण्यात आले आहे. जिल्ह्यात तंबाखूमुक्त अभियानातून एकही शाळा सुटली नाही.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१४ शाळा, आमगाव १५८, देवरी २१०, गोंदिया ४०९, गोरेगाव १५९, सडक-अर्जुनी १७६, सालेकसा १५६ व तिरोडा २०१ अश्या १६८४ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा तंबाखूमुक्त झाल्या असल्या तरी काही शिक्षक आजही तंबाखू चघळताना दिसतात.
दंडात्मक कारवाई
४शाळेत तंबाखू खाताना विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी आढळले तर त्यांना २०० रूपये दंड म्हणून आकारण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात १०० मीटरच्या अंतरात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदर्थाची विक्री करण्यास बंदी करण्यात आली आहे.
२.५० लाख विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
४गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील १६८३ शाळांतील २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ शिक्षण विभागाकडून २२ जानेवारी २०१६ रोजी देण्यात आली. त्यानुसार शाळा तंबाखूमुक्त करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.