तिरोडा पोलिसांनी पकडला १.८ लाखाचा मोहफुल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST2021-02-25T04:37:00+5:302021-02-25T04:37:00+5:30

तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातील दिलीप घनश्याम बरेकर याच्या घरून ५१ प्लास्टिक पोतींमध्ये १०२० किलो सडवा मोहाफुल किंमत ...

Tiroda police seize 1.8 lakh Mohful () | तिरोडा पोलिसांनी पकडला १.८ लाखाचा मोहफुल ()

तिरोडा पोलिसांनी पकडला १.८ लाखाचा मोहफुल ()

तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातील दिलीप घनश्याम बरेकर याच्या घरून ५१ प्लास्टिक पोतींमध्ये १०२० किलो सडवा मोहाफुल किंमत ८१ हजार ६०० रूपये, माया श्यामराव झाडे ३ प्लास्टिक डबकीत ३० लिटर मोहाफुल दारू किंमत ३ हजार रुपये, माया प्रकाश बरेकर यांच्या घरून ५ प्लास्टिक पोतीत १०० किलो मोहाफुल किंमत ८ हजार रुपये, पौर्णिमा दिलावर टेंभेकर रा. कोडेलोहार यांच्या घरून ४० लिटर मोहफुलाची दारू किंमत ४ हजार रुपये, रिना अमरभोज मेश्राम रा. कोडेलोहार हिच्या घरून ५० लिटर मोहफुलाची दारू किंमत ५ हजार रूपये, संध्या देवानंद गोसाई रा. सर्रा हिचे घरझडतीत ६ लिटर मोहफुलाची दारू किंमत ६ हजार रुपये, संजय दुलीचंद चौधरी रा. कवलेवाडा याच्याकडून ४ देशी दारूचे पव्वे किंमत २०८ रुपये असा एकूण १ लाख ८ हजार ८ रूपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार योगेश पारधी, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, नापोशी बर्वे, श्रीरामे, बांते, पोलीस शिपाई उके, महिला भूमेश्वरी तिराले, प्रशांत काहलकर यांनी केली आहे.

Web Title: Tiroda police seize 1.8 lakh Mohful ()