तिरोडा-खैरलांजी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST2021-07-28T04:29:52+5:302021-07-28T04:29:52+5:30

परसवाडा : तिरोडा- खैरलांजी मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ता व पुलाचे बांधकाम काम सुरु आहे. हे काम मागील दोन ...

Tiroda-Khairlanji road works of inferior quality () | तिरोडा-खैरलांजी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ()

तिरोडा-खैरलांजी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ()

परसवाडा : तिरोडा- खैरलांजी मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ता व पुलाचे बांधकाम काम सुरु आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.

तिरोडा- खैरलांजी मार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. काम सुरु असतानाच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नालीची देखील मोडतोड झाली आहे. रस्त्याच्या बाजूला मुरमाऐवजी पहाडी मलमा टाकला जात आहे. करटी बुद्रूक येथे नाली तुटली असून सहा महिन्यापासून त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. काही ठिकाणी नालीवर स्लॅब टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परसवाडा जोड फाट्यावर गिट्टी टाकून ठेवण्यात आली आहे पण, टी पाॅईंटवर रस्ता तयार करण्यात आला नाही. काही ठिकाणी अजूनही काम बाकी आहे. प्रवासी निवारे ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तयार करण्यात आले नाही. त्यामुळे याचा प्रवाशांना उपयोग होणार नाही. मात्र, या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तरी या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्ता बांधकामाचा दर्जा सुधारण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Tiroda-Khairlanji road works of inferior quality ()