टिप्परच्या धडकेत एक जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:48 IST2017-09-27T21:48:39+5:302017-09-27T21:48:52+5:30
मोटारसायकलला टिप्परने दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२७) रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ घडली.

टिप्परच्या धडकेत एक जण जागीच ठार
ठळक मुद्देमोटारसायकलला टिप्परने दिलेल्या धडकेत एक जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मोटारसायकलला टिप्परने दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२७) रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ घडली. लक्ष्मीनरायण बाबुलाल रंगारी (५४) रा. शास्त्रीवॉर्ड गोंदिया असे अपघातील मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मनोहर चौकातील एका सहकाºयाला घेऊन जात असताना टिप्पर क्र. एमएच ३५ के. ३६६८ च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेसंदर्भात टिप्पर चालकावर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३८, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.