आतापर्यंत ७६ डॉक्टरांना केले कार्यमुक्त
By Admin | Updated: July 5, 2014 23:38 IST2014-07-05T23:38:42+5:302014-07-05T23:38:42+5:30
आपल्या विविध रास्त मागण्यांना घेऊन डॉक्टरांची मॅग्मो संघटना असहकार आंदोलन करीत आहे. त्यामुळे शासन त्यांना धमकी देण्याचे कार्य करीत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ४० डॉक्टरांना

आतापर्यंत ७६ डॉक्टरांना केले कार्यमुक्त
असहकार आंदोलन : शासनाने धमकी सोडून चर्चा करावी
गोंदिया : आपल्या विविध रास्त मागण्यांना घेऊन डॉक्टरांची मॅग्मो संघटना असहकार आंदोलन करीत आहे. त्यामुळे शासन त्यांना धमकी देण्याचे कार्य करीत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ४० डॉक्टरांना तर जिल्हा शल्य चिकीत्सकांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेल्या ३६ डॉक्टरांना आतापर्यंत कार्यमुक्त करण्याचे पत्र दिले.
सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्ष लाभ देणे, अस्थाई एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत स्थायी करणे, केंद्र शासन व इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करणे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे, डॉक्टरांचे कामाचे तास निश्चित करणे, आरोग्य विभागाचा पुनर्रचना आयोग स्थापन करणे, व्यवसाय रोध भत्ता ऐच्छीक करणे अशा मागण्यांना घेऊन राज्यभरातील डॉक्टर महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटना (मॅग्मो) संघटना असहकार आंदोलन करीत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. या डॉक्टरांच्या मागण्या रास्त असून त्या मागण्या सोडविण्यापेक्षा त्यांना धमकी देण्याचे काम शासन करीत आहेत.
शासनाने धमकी देणे सोडून मागण्यांवर चर्चा करावी असे जिल्हाध्यक्ष चंदू वंजारे यांन म्हटले आहे. शासनाने कोणतीही कारवाई केली तरी मागण्या पूर्ण होईपर्यत संघटना आंदोलन मागे घेणार नाही. असा इशारा मॅग्मो संघटनेच्या जिल्हा शाखेने दिला आहे.
(तालुका प्रतिनिधी)