पोळा-मारबतच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:34 IST2021-09-07T04:34:36+5:302021-09-07T04:34:36+5:30

लोहारा : पोळा-मारबतच्या सणात शांतता भंग होऊ नये म्हणून जुगार खेळणारे व अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही व्हावी म्हणून ठाणेदार ...

Tight security by the police against the backdrop of Pola-Marbat | पोळा-मारबतच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पोळा-मारबतच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लोहारा : पोळा-मारबतच्या सणात शांतता भंग होऊ नये म्हणून जुगार खेळणारे व अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही व्हावी म्हणून ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी देवरीत जम्बो पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ३ वाहन व ६ पोलीस पथक रस्त्यावर उतरणार आहेत.

देवरी शहर कायदा आणि सुव्यवस्थेचा दृष्टीने नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी पोळा-मारबत सणाला शहरात जुगाराच्या तीन घटना घडल्या होत्या. ज्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर गेल्यावर्षी पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त केल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नव्हती. या वर्षीही जबर पोलीस बंदोबस्त असणार आहे. शिवाय पोलीस अधिकारी-कर्मचारीदेखील रात्रभर बंदोबस्तात तैनात राहतील. रात्रकालीन संचारबंदी सुरू असल्याने यावर्षी फारसा गोंधळ होण्याची शक्यता नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू करणार असल्याचे ठाणेदार सिंगनजुडे यांनी सांगितले.

------------------------

शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक चौकात नाकाबंदी

देवरी शहरातील अनेक ग्रामीण भागांच्या हद्दीत संवेदनशील भाग आहेत. ज्या ठिकाणी पोळा-मारबत सणाच्या निमित्ताने हुल्लडबाजी होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी कायद्याचा भंग होऊ नये यासाठी बंदोबस्तासह पोलिसांनी नाकाबंदी केली जाणार असून, भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे.

-------------------------

तळीराम व जुगार खेळणाऱ्यांची खैर नाही

पोळा-मारबत सणासाठी तळीराम मद्यपान केल्याशिवाय राहत नाहीत. मद्यप्राशन केल्यानंतर आपली वाहने घेऊन काहीजण शहरात गोंधळ घालतात. विशेषता देवरी शहरासह पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या अनेक ग्रामीण भागात जुगार खेळला जातो. यामुळे तळीराम व जुगार खेळणाऱ्यांच्या हालचालींवर पोलीस विशेष लक्ष देणार असल्याची माहिती ठाणेदार सिंगनजुडे यांनी दिली आहे.

Web Title: Tight security by the police against the backdrop of Pola-Marbat