१३ गावांत १५ दिवसांपासून वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:00 AM2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:19+5:30

गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात मागील १५ दिवसात या वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सायंकाळ होताच जंगल परिसरातील गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम मंगेझरी, कोडेबर्रा, रूस्तमपूर, बोदलकसा, आलेझरी, बालापूर तर गोंदिया तालुक्यातील ग्राम जुनेवानी, हनुमानटोला, गंगाझरी, धानुटोला, पांगडी आणि गोरेगाव तालुक्यातील ग्राम बोळूंदा व तिमेझरी, या गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत आहे.

Tiger terror in 13 villages for 15 days | १३ गावांत १५ दिवसांपासून वाघाची दहशत

१३ गावांत १५ दिवसांपासून वाघाची दहशत

googlenewsNext
ठळक मुद्देगावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे निर्देश : आतापर्यंत घेतला दोघांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव, तिरोडा व गोंदिया या ३ तालुक्यातील १३ गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची चांगलीच दहशत आहे. या वाघाने आतापर्यंत दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा रोष वाढल्याने वन विभागाने आता या जंगल परिसरातील गावकºयांना मुनादी देऊन घराबाहेर पडू नये असे निर्देश दिले आहे. त्यामुळे या १३ गावात कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’सह वाघाच्या दहशतीची भर पडली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देश आणि राज्यात सर्वत्र ‘लॉकडाऊन’ व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला आता महिनाभराचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे आधीच ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आणि मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या चिंतेने त्यांना ग्रासले असताना आता त्यात वाघाच्या दहशतीची भर पडली आहे. गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात मागील १५ दिवसात या वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सायंकाळ होताच जंगल परिसरातील गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम मंगेझरी, कोडेबर्रा, रूस्तमपूर, बोदलकसा, आलेझरी, बालापूर तर गोंदिया तालुक्यातील ग्राम जुनेवानी, हनुमानटोला, गंगाझरी, धानुटोला, पांगडी आणि गोरेगाव तालुक्यातील ग्राम बोळूंदा व तिमेझरी, या गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत आहे.
२-३ दिवसांनी गावकऱ्यांना या वाघाचे दर्शन होत असल्याने या परिसरातील गावकऱ्यांनी शेतीची कामे सुद्धा पूर्णपणे बंद केली आहे. एकीकडे ‘लॉकडाऊन’ तर दुसरीकडे वाघाच्या दहशतीला गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच २ दिवसांपूर्वी वन व वन्यजीव विभागाने या गावांमध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले. मात्र यामुळे गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घ्यायला जाणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील परिस्थिती पाहता वन व वन्यजीव विभागाने गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करु न वाघाचा बंदोबस्त लावावा अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी वनसंरक्षक एस.युवराज यांच्याकडे केली. यावर युवराज तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आहे. मात्र वन विभागाकडून जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त लावला जात नाही तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होणार नाही.

परिसरात नेमके वाघ किती ?
तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील जंगला लगत असलेल्या गावांमध्ये मागील १५ दिवसांपासून एका वाघाचा वावर असल्याचे बोलले जात होते. शिवाय वाघाने २ जणांचा बळी सुद्धा घेतला आहे. मात्र भागातील माहितीनुसार या भागात ४ वाघांचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वन आणि वन्यजीव विभागाने या भागात नेमका किती वाघांचा वावर आहे याचा शोध घेवून त्यांचा बंदोबस्त लावण्याची गरज आहे.

Web Title: Tiger terror in 13 villages for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ