शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

गुरुवार ठरणार ‘साहित्य वापर दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:31 IST

अनेक शाळांमध्ये साहित्य पेट्या अजूनही कुलूप बंद आहेत. बहुतांश शाळांमध्ये साहित्यपेट्या वर्गात किंवा कार्यालयात पडून आहेत. शिक्षक या साहित्यांचा वापर करताना दिसत नाहीत. अनेक शिक्षकांना साहित्यांची नावे ही माहिती नाहीत. ते साहित्य कसे वापरायचे व विद्यार्थ्यांना हाताळायला कसे द्यायचे हे काही शिक्षकांना माहिती नाही.

ठळक मुद्दे२९ आॅगस्टपासून प्रारंभ : अनेक शाळांमध्ये साहित्यपेट्या अजूनही कुलूप बंद

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनेक शाळांमध्ये साहित्य पेट्या अजूनही कुलूप बंद आहेत. बहुतांश शाळांमध्ये साहित्यपेट्या वर्गात किंवा कार्यालयात पडून आहेत. शिक्षक या साहित्यांचा वापर करताना दिसत नाहीत. अनेक शिक्षकांना साहित्यांची नावे ही माहिती नाहीत. ते साहित्य कसे वापरायचे व विद्यार्थ्यांना हाताळायला कसे द्यायचे हे काही शिक्षकांना माहिती नाही. हे साहित्य वापरले जावेत यासाठी प्रत्येक गुरूवार हा आता ‘साहित्य वापर दिवस’ म्हणून २९ आॅगस्ट पासून सुरू केला जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात शाळा व शाळेतील शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक खेळ व साहित्याच्या माध्यमातून अध्ययन अनुभव दिल्याने त्यांच्यात शाळेत येण्याची गोडी निर्माण होते. याकरिता महाराष्ट्र शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना गणित, भाषा व इंग्रजी साहित्य पेटी उपलब्ध करुन दिली आहे.या साहित्य पेटीत विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्य घटकांवर आधारित अनेक साहित्य आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांच्या शाळा भेटी घेतल्या असता, असे लक्षात आले की अनेक शाळांमध्ये या साहित्य पेट्या आहेत. परंतु अजूनही कुलूप बंद आहेत.या साहित्य पेटीतील साहित्यांचा सर्व शाळेतील शिक्षकांनी वापर करुन अध्ययन-अध्यापन करण्याच्या हेतूने २९ आॅगस्ट पासून ‘साहित्य वापर दिन’ म्हणून जिल्ह्यात सुरु केला जात आहे. यांतर्गत, प्रत्येक गुरुवारी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील (सीबीएसई व आयसीएसई बोर्ड शाळा गवळून) शिक्षकांनी आपापल्या वर्गात नियोजित तासिकेत साहित्यांच्या मदतीने वर्ग अध्यापन करुन ‘साहित्य वापर दिन’ साजरा करायचा आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी झुम मिटींगच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.वापर होतो किंवा नाही याची, होणार पाहणीसदर उपक्रम २९ आॅगस्टसाठी मर्यादित नसून दर गुरुवारी सर्व तासिकांकरिता नियमित सुरु ठेवला जाणार आहे. पर्यवेक्षकीय अधिकारी जर या दिवशी भेटीवर असतील तर हा दिवस साहित्य पेटीतील साहित्य वापर दिन म्हणून ओळखला जाईल. भेटीदरम्यान पाहणी केली जाईल व गरजेनुसार कितीही वेळा साहित्याचा वापर करुन प्राधान्याने भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांच्या मुलांना अध्ययन अनुभव देण्यावर भर द्यावयाचा आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, साधन व्यक्ती, फिरते विशेष शिक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील किमान एका शाळेला भेट देऊन पाहणी करुन तसा अहवाल सादर करावयाचा आहे.अशा दिल्या मार्गदर्शक सूचनाकेंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, साधनव्यक्ती, बीआरजी-सीआरजी सदस्य व शिक्षकांनी शाळेतील साहित्य पेटीतील साहित्याचे वर्गनिहाय वाटप झाल्याची खात्री करावी, ज्या शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात गणित, भाषा, इंग्रजी, विज्ञान प्रयोग साहित्य व सामाजिक शास्त्र विषयांकरिता साहित्य उपलब्ध नाही अशा शाळांनी शिक्षक-विद्यार्थ्यांच्या मदतीने पाठ्यघटकावर स्वनिर्मित साहित्य तयार करावे, सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी शाळा भेटी दरम्यान झुम मिटींग द्वारे मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी कनेक्ट होऊन शिक्षक शिकवित असलेल्या वर्गाची लाईव्ह स्थिती दाखवायची आहे. तसेच लाईव्ह अध्ययन-अध्यापनाचे निरीक्षण करण्यात येईल, मुख्याध्यापकांनी साहित्याचा वापर करुन शिक्षक अध्यापन करीत आहे याचे फोटो जतन करुन ठेवावे तसेच किती शिक्षकांनी साहित्याचा कोणत्या विषयाकरिता व घटकांकरिता वापर केला याचा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना लगेच सादर करावा.सदर उपक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावयाची आहे. यात कुणीही हयगय करू नये, जे शिक्षक साहित्यांचा वापर करताना दिसून येणार नाही अशा सर्व शिक्षकांची यादी शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय सहायक, साधनव्यक्ती, फिरते विशेष शिक्षक यांना देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील किमान एका शाळेला भेट देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.राजकुमार हिवारेशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया.

टॅग्स :Educationशिक्षण