तंमुसने फुलविला संसार

By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:21:20+5:302016-06-02T01:21:20+5:30

सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) तंटामुक्त समितीने पुढाकार घेवून विवाह तुटलेल्या जोडप्याचा पुन्हा विवाह लावून दिला.

Thumus flowered world | तंमुसने फुलविला संसार

तंमुसने फुलविला संसार

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) तंटामुक्त समितीने पुढाकार घेवून विवाह तुटलेल्या जोडप्याचा पुन्हा विवाह लावून दिला.
साखरीटोला येथील लक्ष्मण नरेश चुटे याचा रत्नमाला बुधराम मेंढे मु. पुराडा ता. देवरी हिचेशी काही दिवसापूर्वी विवाह जुळला होता. परंतु मुलीचे वडील बुधराम मेंढे हे लग्न लावून देण्यास उत्सुक नव्हते, टाळाटाळ करीत होते. शेवटी दोन्ही पक्षांनी लग्न तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र मुलीच्या मनात त्याच मुलाशी प्रेम निर्माण झाले व तिने लक्ष्मणसोबतच विवाह करण्याचा ठाम निर्णय घेवून सरळ ती मुलाच्या घरी पोहोचली. दोघांनीही तंमुसकडे धाव घेऊन विवाह लावून देण्यास विनंती अर्ज केला. दोघेही सज्ञान असल्याने तंमुसचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण लांजेवार यांनी २९ मे २०१६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दोघांचे लग्न लावून दिले.
या वेळी सरपंच संगिता कुसराम, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, ग्रा.पं. सदस्य वीणा गणवीर, डॉ. संजय देशमुख, पत्रकार रमेश चुटे, अशोक मेहर, क्रांती येटरे, संजय कुसराम, दौलत गिरी, ग्रामसेवक संतोष कुटे, संतोष चुटे, विजय लांजेवार, आशिष अग्रवाल उपस्थित होते.
संचालन व आभार प्राचार्य सागर काटेखाये यांनी केले. लग्नप्रसंगी तंमुसकडून वर-वधूंना भांडी, कुंडी भेटवस्तू देण्यात आल्या. या वेळी मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होते.
एका तुटलेल्या विवाहाला पुन्हा विवाह बंधनात अडकविणाऱ्या तंमुसचे सर्व स्तवरावरुन कौतुक होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Thumus flowered world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.