नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे

By Admin | Updated: June 27, 2015 02:27 IST2015-06-27T02:27:02+5:302015-06-27T02:27:02+5:30

लोकमत बाल विकास मंच, केटीएस रूग्णालयाचे नेत्रदान विभाग व मृणाल कोचिंग क्लॉस यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे ...

Through the public eye awareness program | नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे

नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे

गोंदिया : लोकमत बाल विकास मंच, केटीएस रूग्णालयाचे नेत्रदान विभाग व मृणाल कोचिंग क्लॉस यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नावनोंदणी १७ ते २५ जूनदरम्यान सकाळी १० ते १२ वाजतापर्यंत लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे करण्यात येणार आहे.
नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे हा अभिनव उपक्रम असून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नेत्रबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यात स्पर्धकांना पोस्टकार्ड पत्र स्पर्धास्थळी पुरविण्यात येणार आहेत. या पोस्टकार्डमध्ये त्यांना सुवाच्च अक्षरात नेत्रदानाविषयी उत्तम संदेश लिहावयाचे आहे. त्या पत्रात स्पर्धकाला त्याच्या एखाद्या नातलगाचा पत्ता लिहून स्पर्धास्थळी जमा करावयाचे आहे.ही स्पर्धा दोन गटात होणार असून पहिल्या गटातील स्पर्धकांची वय ८ ते १५ व दुसऱ्या गटातील स्पर्धकांची वय १५ वर्षांपेक्षा अधिक, अशी राहणार आहे. दोन्ही गटात सर्वोत्कृष्ट संदेश असणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पत्रांची निवड करण्यात येईल. तसेच दोन्ही गट मिळून उत्कृष्ट १० संदेश असलेल्या पत्रांचीसुद्धा निवड केली जाईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी लोकमत बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Through the public eye awareness program