हातभट्ट्यांवर धाडसत्र

By Admin | Updated: May 30, 2016 01:35 IST2016-05-30T01:35:03+5:302016-05-30T01:35:03+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत दोन दिवसात

Throne on the armchairs | हातभट्ट्यांवर धाडसत्र

हातभट्ट्यांवर धाडसत्र

एक्साईजची कारवाई : २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत दोन दिवसात अवैध हातभट्ट्या, मोहा दारू विक्रेते व देशी दारू विक्री करणाऱ्यांवर धाडसत्र राबवून ३१ गुन्हे दाखल केले. यात १९ आरोपींना मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
अवैध हातभट्टी व मोहा दारू गाळणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरोधात दोन दिवस हे धाडसत्र राबविण्यात आले. यात २९४ लिटर हातभट्टीची दारू, ९०८० लिटर मोहा सडवा, १७ लिटर देशी दारू तसेच हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा २.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत नुतन दशरथ वाघमारे, रा.तेढा, ता.गोरेगाव, अशोक धुर्वे रा.गोंडीटोला ता.गोंदिया, कमलेश पडोळे रा.छोटा गोंदिया, संजय जांभुळकर रा.तिरोडा, आशिष टेंभेकर रा.सोनेगाव, ता.गोंदिया, मधुकर सांगोडे रा.सोनेगाव, ता.गोंदिया, बेनिराम धुवाधवारे रा.लेंडेझरी, परमेश्वर कांबळे रा.तुमखेडा, ता.गोंदिया, रतीराम उईके रा.जामुटोला ता.देवरी, निलेश नेमपाडे रा.करटी, ता.तिरोडा, प्रशांत मेश्राम रा.करटी, प्रतिमा भालाधरे रा.भुराटोला ता.तिरोडा, राजू सुकराम झाडे रा.वडेगाव नाला, ता.तिरोडा, प्रल्हाद उरकुडा पटले रा.वडेगाव नाला, प्रतिमा उके रा.बोरगाव, अर्जुन धमगाये रा.कोडेलोहारा, ता.तिरोडा, सुमेर वासनिक रा.कोडेलोहारा रा.तिरोडा, मदनलाल सेवाराम लिल्हारे रा.नागरा, ता.तिरोडा, उर्षा पुरण वाघाडे रा.कामठाटोली ता.गोंदिया या १९ आरोपींना अटक झाली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक बी.जी.भगत, भरारी पथकाचे प्र.निरीक्षक बी.डी.पटले, दुय्यम निरीक्षक आर.के.निकुंभ, दु.निरीक्षक देवरी एम.पी.चिटमटवार, दु.निरीक्षक देवरी एस.एल. बोडेवार, सहा.दु. निरीक्षक कोवे व रहांगडाले, जवान ढाले, पागोटे, उईके, ढोमणे, मुनेश्वर, हरिणखेडे, सिंधपुरे, दुबे व जवान वाहनचालक सोनबर्से व मडावी यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

परमीटधारक ग्राहकांनाच मद्यविक्री करा
जिल्हाभर सर्व दारू दुकानांमधून परमीटधारक ग्राहकांनाच मद्याची विक्री होते किंवा नाही याची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मे महिन्यात अशा ३ दुकानांवर कारवाई करण्यात आली. मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनीही मद्यसेवन परमीट बाळगूनच मद्याची खरेदी करावी. याकरिता विभागाकडून हजार रुपयात आजीवन परमीट व १०० रुपयात एक वर्षाकरिता परमीट उपलब्ध करून देण्यात येते. हे परमीट नसणाऱ्या ग्राहकांनी दारू दुकानातून एका दिवसाकरिता दोन रुपयाला देशी मद्यसेवन परमीट तर पाच रुपयात विदेशी मद्यसेवन परमीट घेऊनच मद्याची खरेदी करावी, असे आवाहन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.

Web Title: Throne on the armchairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.