अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षाचा सश्रम कारावास
By नरेश रहिले | Updated: October 13, 2023 19:09 IST2023-10-13T19:08:48+5:302023-10-13T19:09:49+5:30
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : ७ हजार ५०० रूपये दंडही ठोठावला.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षाचा सश्रम कारावास
नरेश रहिले, गोंदिया: आई बोलावत आहे असे सांगून अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलवणाऱ्या तरूणाने मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला गोंदियाच्या प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयाने १३ ऑक्टोबर रोजी आरोपीला तीन वर्षाचा सश्रम कारावास व ७ हजार ५०० रूपये दंड ठोठवला. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी केली आहे.
देवेंद्र उर्फ सोन्या भैय्यालाल पारधी (२१) रा.मेंदीपुर ता. तिरोडा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने तिला माझी आई तुला घरी बोलवत आहे, असे म्हणाला. त्यावर ती आपल्या घराच्या बाजूच्या सांदोळीतून जात असतांना आरोपीने घरातुन ये असे तिला बोलला. ती घराचे मागील दार उघडताच आरोपी हा मागचे दारातून घरात आला आणि माझी आई तुला बोलवत नाही असे बोलून तिचा विनयभंग केला. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसात भादंविच्या कलम ३५४, ४५२, सहकलम ६,८ बाल लैंगीक अत्याचार अधिनयिमान्वये गुन्हा दाखल केला होता. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर यांनी केला होता. यासंदर्भात सरकारी वकील म्हणून मुकेश पाटनकर व पुरूषोत्तम आगाशे यांनी काम पाहिले.