विनयभंगातील आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास
By Admin | Updated: October 28, 2014 22:58 IST2014-10-28T22:58:41+5:302014-10-28T22:58:41+5:30
गावातीलच ४५ इसमाने १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. छोटेलाल नारायण चव्हाण (४५) रा. मानेकसा

विनयभंगातील आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास
गोंदिया : गावातीलच ४५ इसमाने १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. छोटेलाल नारायण चव्हाण (४५) रा. मानेकसा असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या गावातीलच १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला होता.
पीडित मुलीचा भाऊ बकरी चारण्यासाठी गेला असताना त्याची एक बकरी हरविली. बकरी हरविल्याची माहिती त्याने घरी येऊन आपल्या वडिलांना दिली. त्यावर वडील बकरी शोधण्यासाठी जंगलात गेले. आपल्या वडिलांच्या पाठोपाठ ती १४ वर्षाची पीडित मुलगीही बकरी शोधण्यासाठी गेली असतांना आरोपी छोटेलाल चव्हाण हा आपल्या शेतात बसला होता.
त्याने त्या पीडित मुलीला कुठे जातोस असे विचारले. त्यावर तिने हरविलेला बकरा पाहण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यावर त्याने माझाही गोरा हरविलेला आहे. माझ्या सोबत चाल दोघेही जनावरांना शोधू असे बोलून तिला जंगलात नेले. तेथे तिचा त्याने विनयभंग केला. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांनी केला. या प्रकरणावर १४ आॅक्टोबर रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश प्रथम आर. जी. अस्मार यांनी निकाल सुनावला.
निकालात त्यांनी आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे. या प्रकरणात पिडीतेची बाजू सरकारी वकील कु. एस. आर. तिवारी यांनी मांडली. (तालुका प्रतिनिधी)