मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील तीन महिलांना अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:56+5:302021-02-05T07:47:56+5:30
गोंदिया : शहरातील नागरिकांचे चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन महिलांना गोंदिया शहर पोलिसांनी २९ जानेवारीच्या सकाळी ...

मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील तीन महिलांना अटक ()
गोंदिया : शहरातील नागरिकांचे चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन महिलांना गोंदिया शहर पोलिसांनी २९ जानेवारीच्या सकाळी ८.३० वाजता अटक केली. गोंदिया येथील मामा चौकातील मोहसीन शेफी शेख (३२) यांचा एक मोबाईल किंमत १० हजार रुपये किमतीचा व दुसरा मोबाईल ७ हजार रुपये किमतीचा घरातून चोरी करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यावर गोंदियाच्या रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या मोकळ्या जागेत काही महिला संशयीतरित्या बसून आहेत. त्यांची विचारपूस केल्यावर त्यांच्याजवळ दोन मोबाईल आढळले.अटक करण्यात आलेल्या त्या तीन महिला डोंगरगड (छत्तीसगड) येथील आहेत. मोबाईल चोरीप्रकरणी चार गुन्हे गोंदिया शहर ठाण्यात दाखल आहेत. गोंदिया शहर ठाण्याचे ठाणेदार महेश बन्सोडे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे व पोलीस कर्मचारी यांनी रेल्वे स्टेशन परिसरात आरोपींनी ठिकठिकाणी खड्डा खोदून जमिनीत गाडून ठेवलेेले २५ मोबाईल जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या त्या मोबाईलची किंमत २ लाख ३२ हजार रुपये सांगितली जाते. या महिलांना अटक केल्यावर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे, पोलीस नायक योगेश बिसेन, पोलीस नायक ओमेश्वर मेश्राम, सतीश शेंडे,प्रमोद चव्हाण, विकास वेदक, विजय मानकर, बाटबल, तोंडरे, दोनोडे यांनी केली.