तोतया नक्षलवाद्यांनी तिघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:52+5:302021-07-08T04:19:52+5:30

गोंदिया : सालेकसा ते दरेकसादरम्यान असलेल्या शारदा मंदिरजवळ तीन अनोळखी इसमांनी नक्षलवादी असल्याचे सांगून कारमधील तिघांकडील एक लाख ...

The three were robbed by the Naxalites | तोतया नक्षलवाद्यांनी तिघांना लुटले

तोतया नक्षलवाद्यांनी तिघांना लुटले

गोंदिया : सालेकसा ते दरेकसादरम्यान असलेल्या शारदा मंदिरजवळ तीन अनोळखी इसमांनी नक्षलवादी असल्याचे सांगून कारमधील तिघांकडील एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मंगळवारी (दि.६) सायंकाळी ५.२५ वाजेदरम्यान घडली.

व्यंकटराव सदाशिवराव ढोमणे (७१), छन्नूलाल रोखडे, मालन कारेमोरे, जायचर ज्ञानेश्वर निनावे (रा. रायपूर) हे कार (क्रमांक सीजी ०४- एचए १६२३) ने सालेकसा ते दर्रेकसा मार्गाने जात असताना शारदा मंदिरजवळ तीन अनोळखी इसमांनी जबरीने त्यांची गाडी थांबविली. त्यांना सिमेंट रस्त्याच्या डाव्या बाजूला ७०० ते ८०० मीटर आतमध्ये नाल्याकडे नेले व व्यंकटराव व वाहन चालकाला काठीने मारून व चाकूचा धाक दाखविला. आमचे दोन नक्षल साथीदार रायपूर जेलमध्ये आहेत. बाकी साथीदार जंगलामध्ये आहेत असे बोलून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच त्यांच्या जवळून सोन्याच्या ३ अंगठ्या, ४५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, असे एक लाख ८० हजार रुपयांचे दागिने, सहा हजार ५०० रुपये किमतीचे ३ मोबाइल, एक हजार २०० रुपये रोख, असा एक लाख ८७ हजार ७०० रुपयांचा माल लुटून नेला. सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते करीत आहेत.

Web Title: The three were robbed by the Naxalites