प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेचे तीनतेरा

By Admin | Updated: August 25, 2015 02:21 IST2015-08-25T02:21:22+5:302015-08-25T02:21:22+5:30

शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र अंमलबजावणी

Three-way cleanliness in primary health center | प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेचे तीनतेरा

प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेचे तीनतेरा

साखरीटोला : शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र अंमलबजावणी करणारी यंत्रणा शासनाच्या योजनांचा कसा बट्याबोळ करते, आरोग्य विभागच जनतेच्या व रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ करते, स्वच्छतेचे धडे देणारे डॉक्टर स्वच्छतेविषयी किती बेफिकीर असतात, याचे जिवंत चित्र जि.प.चे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांनी सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक भेटीदरम्यान उघड्या डोळ्यांनी अनुभवले.
दि. २३ आॅगस्टला सकाळी १०.४५ वाजता समाजकल्याण सभापती वडगाये यांनी सालेकसा तालुक्यातील सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रात पसरलेली घाण, रुग्णांची अव्यवस्था पाहून आश्चर्य व्यक्त केले. लगेच पत्रकारांना आरोग्य केंद्रात पाचारण केले व संपूर्ण अव्यवस्थेची कल्पना देऊन दोषींवर कारवाईचे संकेत दिले. सभापतींच्या आकस्मिक भेटीने वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.डी.चाटे चांगलेच भांबावून गेले होते.
यावेळी भेट रजिस्टरवर वडगाये यांनी नोंद केली. सभापतींच्या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित नव्हते. सर्वत्र कचरा व घाण पसरलेली होती. सर्व विभागाची पाहणी केली असता स्वच्छता नव्हती, कोणत्याही खोलीत झाडू मारला नव्हते, प्रत्येक वॉर्डात घाण पसरली होती. सामान अस्ताव्यस्त होते. स्त्री प्रस्तुती वार्डात एका खोलीत केवळ तीन प्रसुती झालेल्या रुग्णांना ठेवणे आवश्यक असताना सहा रुग्णांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे गर्दी निर्माण झाली होती.
शौचालय, बाथरुममध्ये घाण पसरली होती. त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले होते. वापर केलेली औषधी, इंजेक्शन्स इतरत्र फेकलेले होते. शौचालयाचा दरवाजा तुटलेला होता.
या वातावरणात रुग्ण बरा होण्यापेक्षा अधिकच बिमार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सभापती चांगलेच भडकले व डॉ.चाटे यांना धारेवर धरले. सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे देवरी-आमगाव मुख्य मार्गावर आहे.
समाजकल्याण सभापती यांनी भेट दिली तेव्हा त्यांचेसोबत भाजपाचे जिल्हा महामंत्री परसराम फुंडे, भीमराज बोहरे, रमेश चुटे उपस्थित होते.
आता दोषीवर कोणती कारवाई होते याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)

रिक्त पदांची अडचण
४यावेळी डॉ. चाटे यांनी सदर आरोग्य केंद्रात ए.एन.एम.चे एक पद, परिचर व सफाई कामगार यांचे पद रिक्त असल्याने सदर प्रकार होत असल्याचे सांगितले. सदर पदे भरतीसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. पुढील दोन दिवसात स्वच्छता करून रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी हमी दिली.
४मुक्कामाला असलेल्या स्त्री रुग्णांना जेवणाचे डबे पुरविणाऱ्या स्त्रीला प्रत्येक डब्यामागे केवळ १० रुपये मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डब्बे घ्यायला परवडत नसल्याचे योगिता भलावी यांनी सांगितले.

Web Title: Three-way cleanliness in primary health center