कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांची तीन वाहने पकडली
By Admin | Updated: September 17, 2014 23:55 IST2014-09-17T23:55:50+5:302014-09-17T23:55:50+5:30
शहराच्या रिंगरोड येथील रेल्वे क्रासिंगवर रामनगर पोलिसांनी कत्तल खान्यात जाणाऱ्या जनावरांचे तीन ट्रक जप्त केले. ही कारवाई मंगळवारच्या सकाळी ७ वाजता करण्यात आली. या प्रकरणात सहा

कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांची तीन वाहने पकडली
गोंदिया : शहराच्या रिंगरोड येथील रेल्वे क्रासिंगवर रामनगर पोलिसांनी कत्तल खान्यात जाणाऱ्या जनावरांचे तीन ट्रक जप्त केले. ही कारवाई मंगळवारच्या सकाळी ७ वाजता करण्यात आली. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली.
सहायक फौजदार रामचंद्र भूरे व त्यांच्या चमूने सदर कारवाई केली. बालाघाटच्या मल्हारा येथील फिरदोश साजिद खान (३१), शेख मोहसीन शेख नासिर शेख (२०) रा. बकरा कामेला कामठी, गेंदलाल श्रीराम सयाम (३३) रा. चंगेरा, हौसीलाल लालजी उईके (४५) रा. चंगेरा, मुस्ताख खान राज खान (४०) रा. चंगेरा, सुरज शामलाल बागळे (१९) रा. चंगेरा या सहा जणांना अटक करण्यात आली.
हे आरोपी दोन ट्रक व तीन पिकअपमध्ये ५५ जनावरे कत्तल खान्यात घेवून जात होते. त्यातील एक जनावर मृत होता. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किमत १४ लाख तर जनावरांची किमत १ ला ९६ हजार सांगितली जाते. सदर प्रकरणात रामनगर पोलिसांनी १५ लाख ९६ हजाराचा माल जप्त केला आहे.
सदर आरोपींविरुद्ध पशु संवर्धन कायदा कलम ५, ६, ११ सहकलम ६३, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)