जनावरांचे तीन ट्रक पकडले
By Admin | Updated: February 3, 2016 01:59 IST2016-02-03T01:59:19+5:302016-02-03T01:59:19+5:30
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणारे तीन ट्रक पकडण्यात आले.

जनावरांचे तीन ट्रक पकडले
गोंदिया : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणारे तीन ट्रक पकडण्यात आले.
चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेहताखेडा येथे सीजी ०४ एन.ए.४८५२ या ट्रकमध्ये १७ रेडे व म्हैेस डांबून वाहतूक करीत असताना पोलिसांनी तो ट्रक पकडला. ट्रकची किंमत ६ लाख रुपये तर रेड्यांची किंमत १ लाख ७० हजार रुपये सांगितली जाते. सदर कारवाई सोमवारी दुपारी १२ वाजतादरम्यान करण्यात आली. या प्रकरणात आरोपी शेख अयुब शेख रसीद शेख (३७) रा.एनआईटी क्वॉर्टर १९/१२ यशोधरा नगर नागपूर, वैभव विनोद उके (१९) रा. राणी दुर्गावती चौक पेट्रोल पंप जवळ इतवारी नागपूर व अब्दुल सोहेब अब्दुल अजीम शेख (२४) रा.ईटाभट्टा चौक, हजरत निजामुद्दीन कॉलनी यशोधरा नगर नागपूर या तिघांवर प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) अ, ड, फ, महाराष्ट्र पशु संवर्धन कायद्याचे कलम ६,९ मोटार वाहन कायदा कलम १९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी कारवाई मेहताखेडा येथे सोमवारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ट्रक एम.पी.२० एच.बी. ३६७४ मध्ये १४ रेडे आणि म्हैश डांबून कत्तलखान्यात नेत असताना चिचगड पोलिसांनी आरोपीला पकडले. या प्रकरणात स्रेहदीप ताराचंद गोखले (२५) रा. इंदिरामाता झोपडपट्टी यशोधरा नगर नागपूर, सोनू ऊर्फ धीरज अनिल रेड्डी (२७) रा. पिवळी नदी साई मंदिराच्या मागे जरीपटका नागपूर व मोहम्मद इसान शेख मोहम्मद असलम शेख (२२) रा.ईटाभट्टा पाणीफवारा एस.आर.ए. कॉलनी यशोधरा नगर नागपूर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत १ लाख ४० हजार तक ट्रक ची किंमत ६ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत ट्रक एम.एच.३२ बी ४८६५ मध्ये १३ बैल डांबून वाहतुक करीत असताना समीप हबीब खान (२४) रा. पिवळी नदी नागपूर, वसीम अब्दुल कुरैशी (२४) रा. भाजीमंडी शितला माता चौक कामठी नागपूर, रियाज रवूफ खान (२०) रा. भाजीमंडी शितला माता चौक कामठी या तिघांवर गुन्हा दाखल केला. (तालुका प्रतिनिधी)