तलाठ्यास तीन हजारांची लाच भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:25 IST2019-02-23T23:24:49+5:302019-02-23T23:25:44+5:30

ट्रॅक्टर सोडल्याचा मोबदला म्हणून ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठ्यास रंगेहात पकडले. तिरोडा तालुक्यातील ग्राम एकोडी येथे शुक्रवारी (दि.२२) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

Three thousand bribe bribe | तलाठ्यास तीन हजारांची लाच भोवली

तलाठ्यास तीन हजारांची लाच भोवली

ठळक मुद्देसेजगाव येथील कारवाई : ट्रॅक्टर सोडल्याचा मोबदला मागितला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ट्रॅक्टर सोडल्याचा मोबदला म्हणून ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठ्यास रंगेहात पकडले. तिरोडा तालुक्यातील ग्राम एकोडी येथे शुक्रवारी (दि.२२) दुपारी ही कारवाई करण्यात आली. देवेंद्र टोलीराम नेवारे (३५) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार आपल्या ट्रॅक्टरने मातीची वाहतूक करीत असताना तलाठी नेवारे याने त्यांना पकडले. तसेच ट्रॅक्टरवर वर्षभर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी केली. मात्र त्यावेळी तक्रारदाराने २ हजार रूपये व उर्वरीत रक्कम आणून देतो असे सांगीतले. त्यानंतर नेवारे याने ८ हजार रूपयांची मागणी केली असता तक्रारदाराने एकमूश्त रक्कम देता येणार नाही असे सांगीतले. यावर नेवारे टप्याटप्याने पैसे दे असे बोलून पहिली किश्त म्हणून ३ हजार रूपयांची मागणी केली.
यावर मात्र तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने ग्राम एकोडी येथे सापळा लावला असता तलाठी नेवारे पंचासमक्ष ३ हजार रूपयांची लाच घेताना अडकला. आरोपीवर गंगाझरी पोलिसांत लालुप्र अधिनियम २०१८ कलम ७ (ए) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Three thousand bribe bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.