मालवाहूच्या धडकेत तीन विद्यार्थी जखमी
By Admin | Updated: December 15, 2015 03:57 IST2015-12-15T03:57:10+5:302015-12-15T03:57:10+5:30
बनगाव येथील कालव्याच्या मार्गावर लोखंडी सळाखी घेऊन जाणारे एक मालवाहू वाहन अनियंत्रित होऊन झाडाला

मालवाहूच्या धडकेत तीन विद्यार्थी जखमी
आमगाव : बनगाव येथील कालव्याच्या मार्गावर लोखंडी सळाखी घेऊन जाणारे एक मालवाहू वाहन अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी घडला.
प्राप्त माहितीनुसार, सरस्वती विद्यालयाचे तीन विद्यार्थी अजय बुधराम कागदीमेश्राम (१६), रा.माली, उमेंद्र ओमकार दिवाडे (१६), रा.किडंगीपार, संदीप बाळकृष्ण कावरे (१६), रा.महारीटोला हे शाळेसमोरील झाडाच्या ओट्यावर बसलेले असताना त्याचवेळी लोखंडी सळाखी घेऊन मालवाहक (२०७) गाडी (एमएच ४९, डी ०८३६) लोखंडी सळाखी घेऊन येत होती. त्या चालकाचे नियंत्रण सुटल आणि त्याच्या वाहनाची झाडाला धडक बसली. त्यामुळे झाडाच्या ओट्यावर बसलेले तीन विद्यार्थी जखमी झाले. आमगाव पोलिसांनी मेटॅडोर चालक मनोज थेर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
क्रीडा संमेलन
तिरोडा : स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या वतीने कवलेवाडा केंद्राचे क्रीडा व स्रेहसंमेलन दि.१५ ते १८ डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक जुनी वस्तीशाळा तिरोडा येथे आयोजित केले आहे. यात विद्यार्थ्यांचे सांघिक सामने जि.प. हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणार आहेत.
दि. १५ ला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या हस्ते होणार आहे.