अन्न व औषध प्रशासन विभागाची तीन ठिकाणी धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:49 IST2017-10-17T23:49:37+5:302017-10-17T23:49:48+5:30
दिवाळीच्या दिवसात भेसळ होण्याचे प्रकार नेहमीच पुढे येतात. या दरम्यान अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीदेखील तत्पर असतात. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान गोंदियात तीन कारवाया करून डालडा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन विभागाची तीन ठिकाणी धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीच्या दिवसात भेसळ होण्याचे प्रकार नेहमीच पुढे येतात. या दरम्यान अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीदेखील तत्पर असतात. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान गोंदियात तीन कारवाया करून डालडा जप्त करण्यात आला. अॅग्मार्क नसलेला तेल जप्त केला तर रसगुल्ला तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया छेनामध्ये किडे आढळल्याने ४७ किलो छेना नष्ट करण्यात आला.
१३ आॅक्टोबर रोजी गोंदियातील दिलीप भगवानदास सलुजा यांच्या किराणा दुकानात रूची वनस्पती नावाचा डालडा २ क्विंटल ५३ किलो किंमती २५ हजार ३५६ रूपयाचा माल जप्त करण्यात आला. १६ आॅक्टोबर रोजी गोंदियातील हरगुन बजाज यांच्या शिव आॅईल मूर्री रोड गोंदिया येथे केशव ब्रॉन्ड नावाचे १ क्विंटल ९ किलो वजनाचा तेल जप्त करण्यात आला. १७ आॅक्टोबर रोजी सुजाता बोस यांच्या मिठाईच्या कारखाण्यावर धाड टाकण्यात आली. कस्तुरबा वॉर्डाच्या तिवारी धर्मशाळेमागे आनंद मिष्ठान्न भंडारची मिठाई तयार करण्याचा कारखाना आहे. त्या कारखान्यात बंगाली मिठाई रसगुल्ला तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया छेनामध्ये किडे पडलेले दिसल्याने ४७ किलो छेना जप्त करून कारवाई करण्यात आली.
आनंद मिष्ठान्न भंडार या दुकानाचा परवाना आहे. परंतु ज्या ठिकाणी ही मीठाई तयार केली जात आहे त्या कारखान्याचा परवानाही नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
सदर कारवाई अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अखीलेश राऊत, पियुष मानवटकर यांनी केली.