तीन लाखांचा माल जप्त

By Admin | Updated: August 29, 2016 00:07 IST2016-08-29T00:07:33+5:302016-08-29T00:07:33+5:30

गडचिरोली व चंद्रपूर येथे दारूबंदी असतानाही मध्यप्रदेशातील दारू गोंदिया मार्गे गडचिरोली व गोंदिया येथे ...

Three lakhs of goods seized | तीन लाखांचा माल जप्त

तीन लाखांचा माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : मध्य प्रदेशातील दारू येते जिल्ह्यात
गोंदिया : गडचिरोली व चंद्रपूर येथे दारूबंदी असतानाही मध्यप्रदेशातील दारू गोंदिया मार्गे गडचिरोली व गोंदिया येथे आणली जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हि दारू पकडली. स्थागुशाच्या पथकाने तीन कारवायांत दारूसह तीन लाखांचा माल जप्त केला आहे.
यामध्ये पहिल्या कारवाईत, ११ आॅगस्ट रोजी निशांत ऊर्फ भुऱ्या ईश्वरदास डोंगरे (३५,रा.कुंभारेनगर) हा पाच हजार ५०० रूपये किमतीचे इंपेरियल ब्ल्यूचे ४४ पव्वे घेऊन जात असताना पथकाने त्याला जयस्तंभ चौकात पकडले.
दुसऱ्या कारवाईत, २४ आॅगस्ट रोजी पाटेकुर्रा ते डव्वा दरम्यान बंशी किसनचंद चांदवानी (५०,रा.यादव चौक,गोंदिया) याला अटक करण्यात आली. बंशी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३१/एएच १८५ मध्ये आॅफीसर चॉईसचे १६८ पव्वे व इम्पेरियल ब्ल्यूचे ९० पव्वे टाकून वाहतुक करीत होता. पोलिसांनी वाहन व दारू असा एक लाख २३ हजार ५४० रुपयांचा माल जप्त केला आहे.
तर तिसऱ्या कारवाईत, २६ आॅगस्ट रोजी मरारटोलीच्या रेल्वे फाटकाजवळ पथकाने अमर उर्फ काली रिजूमल मुलचंदानी (३१,रा.माताटोली ) व राकेश राजेंद्रलाल पिपलेवार (२९,रा.बसस्टॉप चौक, खमारी) यांना पकडले. दोघे चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३५/एम ४६० मध्ये जेट व्हिसकीच्या २१ हजार २४० रूपयांच्या ७२ बॉटल विना परवाना वाहून नेत होते.
या तिन्ही कारवायांत पथकाने तीन लाख २८० रुपयांचा माल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयराज रनवरे, हवालदार अर्जुन कावळे, अजय सव्वालाखे, धनंजय शेंडे, जय शहारे, विनय शेंडे यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three lakhs of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.