तीन लाखाचे पुंजणे खाक
By Admin | Updated: November 19, 2016 00:40 IST2016-11-19T00:40:40+5:302016-11-19T00:40:40+5:30
आमगाव तालुक्याच्या ठाणा येथील धनराज भेलावे व भोजराज भेलावे यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांना आग लागल्याने

तीन लाखाचे पुंजणे खाक
गोंदिया : आमगाव तालुक्याच्या ठाणा येथील धनराज भेलावे व भोजराज भेलावे यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांना आग लागल्याने दोन पुंजण्याचे धान राख झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान लागलेल्या आगीत ३ लाखाचे धान जळाले. या आगीची माहिती गावकऱ्यांना लागताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून आग विसविण्याची कसरत केली. त्यामुळे काही पुंजणे वाचले.(तालुका प्रतिनिधी)