तीन पेटी दारूसह अटक
By Admin | Updated: March 6, 2017 00:49 IST2017-03-06T00:49:54+5:302017-03-06T00:49:54+5:30
रावणवाडी जवळ गोंदिया-बालाघाट रस्त्यावर वर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूची मोटर सायकलने वाहतूक करणाऱ्या एकास अटक केली.

तीन पेटी दारूसह अटक
विशेष पथकाची कारवाई: १९ हजाराचा माल जप्त
गोंदिया : रावणवाडी जवळ गोंदिया-बालाघाट रस्त्यावर वर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूची मोटर सायकलने वाहतूक करणाऱ्या एकास अटक केली.
ही कारवाई शनिवारी सायंकाळी ७.१५ वाजता दरम्यान करण्यात आली. मोटारसायकल एमएच३५/वाय-५८२८ या सायकलवर आरोपी मुन्नालाल शंकर मेश्राम (३७) रा. सतोना हा तीन पेटीत १८० मिलीचे १४४ देशी दारुचे पव्वे किंमत ७ हजार २०० रुपयाचा माल घेऊन जात असताना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या मोटारसायकलची किंमत १२ हजार रुपये सांगितली जाते. १९ हजार २०० रुपयाचा एकूण माल जप्त करण्यात आला.
आरोपी विरूध्द रावणवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) ७७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई
जिल्हा पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत अवैध दारू विक्रेत्यांकडून दारु जप्त केली. गोंदिया शहर पोलिसांनी कचरा मोहल्ल्यातील वजीर बसीर शेख (३८) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारु, जोगलेकर वॉर्ड गोंविदपूर येथील किशोर चुन्नीलाल मौजे (४१) याच्याकडून १० लिटर हाभट्टीची दारु जप्त करण्यात आली. सदर आरोपींकडून मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.