खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:08+5:302021-03-31T04:29:08+5:30

गोंदिया : शहरातील नंगपुरा-मूर्री येथील आनंद राजेश नागपुरे (वय २४, रा. बब्बा भवनाचे मागे भीमनगर) या तरुणाला धारदार शस्त्र ...

Three arrested for attempted murder | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

गोंदिया : शहरातील नंगपुरा-मूर्री येथील आनंद राजेश नागपुरे (वय २४, रा. बब्बा भवनाचे मागे भीमनगर) या तरुणाला धारदार शस्त्र व दगडाने मारून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. २९) सकाळी ७.३० च्या दरम्यान घडली. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ तासांच्या आत पकडले. अतुल कौशल नेवारे (२१), करण केवल अंबादे (१९) व राज ऊर्फ चिंटू ओमकार लहरे (१९, रा. लालपहाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

नंगपुरा-मुरी येथे आरोपींनी आनंद नागपुरे याच्यावर अतुल नेवारे याच्या मोबाईल चोरीचा आळ घेऊन धारदार शस्त्र व दगडाने मारून ठार करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तेजेन्द्र मेश्राम, पोलीस हवालदार राजेन्द्र मिश्रा, अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, पोलीस नायक चित्तरंजन कोडापे, पंकज खरबडे हे धूलिवंदन बंदोबस्त पेट्रोलिंग व गुन्हेगार शोध माेहीम राबवीत असताना हायफाय चौक येथील आनंद राजेश नागपुरे याच्या खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी आमगाव हद्दीत असल्याची माहिती मिळाली. आरोपी आमगाववरून लांजी (मध्य प्रदेश) मार्गाने जात असताना त्यांना मनेरी गावाजवळील नाल्याजवळ अटक करून गोंदियात आणले.

Web Title: Three arrested for attempted murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.