महिलेच्या विक्रीप्रकरणी तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 00:45 IST2016-09-22T00:45:22+5:302016-09-22T00:45:22+5:30

करडी व रोहा येथील दोन इसमांनी एका ३० वर्षीय, दोन मुलांची आई असलेलय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून

Three accused arrested in the sale of the woman | महिलेच्या विक्रीप्रकरणी तीन आरोपींना अटक

महिलेच्या विक्रीप्रकरणी तीन आरोपींना अटक

करडी पोलिसांची कामगिरी : आणखी एका आरोपीच्या अटकेची शक्यता
करडी (पालोरा) : करडी व रोहा येथील दोन इसमांनी एका ३० वर्षीय, दोन मुलांची आई असलेलय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जळगाव येथील चार जणांसोबत ७० हजारात विक्रीचा सौदा केला. सौद्यातील ५० हजारांची रक्कम देतो म्हणून आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने करडी पोलिसात दिल्या प्रकरणी शोध पथकाने माडगी व देव्हाडी येथून १९ सप्टेंबर रोजी राजू खंडरे रा.करडी व अशोक गायधने रा.रोहा तसेच सौद्यातील प्रकाश पाचोळे रा.आंबाडी (सिल्ली) यांना अटक केली. आणखी एका आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.
जिल्हा गोंदियातील देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ककोडी येथील दोन मुलांची आई असलेल्या गरीब महिलेच्या पतीचा ५ वर्षापूर्वी मृत्यू झाला. गावातच एकाकी जीवन जगत असताना ती भंडारा तालुक्यातील कारधा येथील मावशीच्या गावी यायची. दरम्यान तिची ओळख सिल्ली येथील प्रकाश पाचोळे सोबत झाली. त्यांचे माध्यमातून करडी रोहा येथील राजू खंडरे व अशोक गायधने यांचेशी ओळख झाली. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ती मावशीच्या गावी कारधा येथे आली होती. त्या दरम्यान दोन्ही आरोपींनी तिला लग्नाचे आमिष दाखवून जळगाव येथील चार इसमांसोबत तिचा ७० हजारात विक्रीचा सौदा केला होता. लग्नाची गोष्ट पक्की झाल्याचे तिला सांगण्यात आले होते.
दोन्ही आरोपींनी तिला सौद्यातील ५० हजार रुपये देतो, म्हणून कारध्यावरून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने करडी गावी आणले. तिला पाहून यांच्यातील सैतान जागा झाला. बहाणा करून त्यांनी तिला करडी वरून देव्हाडा ते साकोली मार्गाने मोहगाव ते निलज बुज. दरम्यान पांदन रस्त्याला नेवून रात्री ८.३० वाजताचे दरम्यान तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. प्रकरणी करडी पोलिसात सदर महिलेने दि. १७ सप्टेंबर रोजी तक्रार केली. कलम ३७६ (२), (ड) भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Three accused arrested in the sale of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.