खोडशिवणी खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST2021-06-18T04:21:21+5:302021-06-18T04:21:21+5:30
सडक अर्जुनी : तालुक्यातील म्हसवानी येथील खुमराज बलिराम रहांगडाले यांचा १३ जून रोजी सायंकाळी खोडशिवणी म्हसवानी मार्गावर खून करण्यात ...

खोडशिवणी खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक
सडक अर्जुनी : तालुक्यातील म्हसवानी येथील खुमराज बलिराम रहांगडाले यांचा १३ जून रोजी सायंकाळी खोडशिवणी म्हसवानी मार्गावर खून करण्यात आला होता. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना गुरुवारी (दि. १७) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये योगेश फागुलाल बोपचे (२७) मरघट रोड बजाज वाॅर्ड, गोंदिया, निवासी पोमेश पन्नालाल पटेल (२५) यांच्यासह अन्य एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार म्हसवानी येथील खुमराज बलिराम रहांगडाले हे १३ जून रोजी सायंकाळी आपल्या आजारी मुलीला औषध आणण्यासाठी खोडशिवणी येथे गेले होते. मात्र, ते घरी परतलेच नाहीत. दरम्यान, त्यांचा मृतदेह खोडशिवणी - म्हसवानी मार्गावर आढळला होता. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा खून करण्यात आल्याची बाब पुढे आल्यानंतर याप्रकरणी आरोपी विरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये दाखल करण्यात आला. यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तपासादरम्यान मृतक व आरोपी यांच्यामध्ये जमिनीवरुन वाद सुरू असल्याची माहिती मृतकाचा मुलगा निखिल खुमराज रहांगडाले व मुलगी दामिनी उर्फ स्वाती यांनी दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे या दिशेने फिरविली. योगेश बाबूलाल बोपचे याची चौकशी करून विचारपूस केली असता त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने खुमराज रहांगडाले याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या दोन्ही आरोपींशी चौकशी केली असता त्यांनी यात सहभागी असल्याची कबुली दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सफौ. कापगते, लिलेंद्र बैस, पोहवा राजेंद्र मिश्रा, पोना. तुरकर, बिसेन तथा चालक पांडे यांनी केली.