लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पांढरवाणी मालगुजारी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर हमालांची मजुरी न मिळाल्यामुळे केंद्रावर वजन काटा करण्यास त्यांनी नकार दिल्याने हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहे.सध्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. पांढरवाणी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान विक्रीस आणला आहे. मात्र केंद्रावरील हमालांना मजुरी न मिळाल्याने धानाचा काटा करणे बंद केले आहे.परिणामी मागील चार पाच दिवसांपासून काटे बंद असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे काही खासगी व्यापारी शेतकऱ्यांचे सातबारा मिळवून त्यांच्यावर धानाची विक्री करीत असल्याची ओरड आहे. तर काही केंद्रावर आधी व्यापाऱ्यांचा धानाचा काटा केला जात असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड सुरू आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाचा काटा होत नसल्याने शेतकरी अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत असून हाच धान नंतर व्यापारी धान खरेदी केंद्रावर विक्री करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर हमाल धानाचा वजन काटा करण्याचे काम करीत आहेत. परंतु त्यांची मजुरी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाचा वजनकाटा करून धान खरेदीचे काम त्यांनी बंद केले आहे. परिणामी धान खरेदी ठप्प आहे. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. धानाचे काटे होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड सुरू असताना अद्यापही संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे.उपप्रादेशिक विभाग व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ नवेगावबांध यांनी याप्रकरणी लक्ष देऊन अडचण दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.आधारभूत केंद्रावर धान खरेदी करतेवेळी वजन काटा करणाऱ्या हमालांची मजुरी दिली नाही. त्यामुळे काही दिवस धान खरेदी बंद होती परंतु त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा बोलाविण्यात आले आहे.बुधवारपासून धान खरेदी सुरू झाली आहे.- चंदू चुटे, केंद्रप्रमुख आधारभूत धान खरेदी केंद्र पांढरवाणी.
पांढरवानी धान खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाचा काटा होत नसल्याने शेतकरी अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत असून हाच धान नंतर व्यापारी धान खरेदी केंद्रावर विक्री करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर हमाल धानाचा वजन काटा करण्याचे काम करीत आहेत. परंतु त्यांची मजुरी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाचा वजनकाटा करून धान खरेदीचे काम त्यांनी बंद केले आहे.
पांढरवानी धान खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान पडून
ठळक मुद्देहमाल मजुरीपासून वंचित : प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांची कोंडी