राखी बांधण्यास आलेल्यांची एकमेकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:38+5:302021-08-23T04:31:38+5:30
गोंदिया : शहराच्या गांधी वॉर्डात राखी बांधायला आलेल्या लोकांनी आपसात वाद घातला. याचा परिणाम फ्रीस्टाईलमध्ये झाला. दोन्ही पक्षांनी एकमेकांना ...

राखी बांधण्यास आलेल्यांची एकमेकाला मारहाण
गोंदिया : शहराच्या गांधी वॉर्डात राखी बांधायला आलेल्या लोकांनी आपसात वाद घातला. याचा परिणाम फ्रीस्टाईलमध्ये झाला. दोन्ही पक्षांनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही पक्षांतील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. आमगाव तालुक्याच्या कालीमाटी येथील महेश रोशन राऊत (३०) हे पत्नीला घेऊन राखी बांधायला आले असताना याच ठिकाणी बालाघाट जिल्ह्याच्या वाराशिवणी कोसरीटोला येथील हेमंत विजय नंदेश्वर (३०), मेघा हेमंत नंदेश्वर (२०) ह्या आरोपी कविता मनोज चौधरी (४२) रा. गांधी वॉर्ड गोंदिया यांच्याकडे आले होते. त्यांनी महेशसोबत विनाकारण वाद करून २२ ऑगस्टच्या सकाळी ११ वाजता लाथाबुक्यांनी मारहाण करून ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात तीन आरोपींवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर हेमंत नंदेश्वर यांच्या तक्रारीवरून महेश रोशन राऊत (३०) याच्याविरुध्द भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.