‘त्या’ सात गावांना तेंदूविक्रीत फायदा

By Admin | Updated: April 7, 2017 01:31 IST2017-04-07T01:31:37+5:302017-04-07T01:31:37+5:30

जंगलातून निघणाऱ्या तेंदूपानाच्या व्यवहारात ग्रुफ आॅफ ग्रामसभेने एकाच कंत्राटदाराला कंत्राट दिला.

'Those' seven villages benefited from tendulkar marketing | ‘त्या’ सात गावांना तेंदूविक्रीत फायदा

‘त्या’ सात गावांना तेंदूविक्रीत फायदा

ग्रृप आॅफ ग्रामसभेतून बाहेर : एक कोटी १० हजार २९६ रूपये विक्रमी किंमत
गोंदिया : जंगलातून निघणाऱ्या तेंदूपानाच्या व्यवहारात ग्रुफ आॅफ ग्रामसभेने एकाच कंत्राटदाराला कंत्राट दिला. मात्र त्यातून बाहेर पडलेल्या गावांना ई-निविदेच्या माध्यमातून जास्त नफा झाला आहे. त्यांना आमंत्रित निविदा कार्यक्रमांमुळे त्या गावांना सध्याच्या बाजारभावानुसार एक कोटी १० हजार २९५ रूपये एवढी विक्रमी किंमत प्राप्त झाली.
वन अधिकार मान्य गावांना तेंदूपत्ता विक्रीसाठी ग्रामसभेच्या अधिकारात वन विभाग गोंदियाद्वारे बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातो, हे भ्रामक व निराधार असल्याचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांचे म्हणणे आहे. सन २०१७ तेंदूपत्ता हंगामात जिल्ह्यातील सामूहिक वनाधिकार प्राप्त गाव चुटिया (लोधीटोला), तेढा, कोयलारी, गोपालटोली, पांढरी, महाका, व येडमागोंदी येथील ग्रामसभेच्या माध्यमाने संकलित होणारा तेंदूपत्ता विक्रीसाठी ग्रृप आॅफ ग्रामसभेने विक्री प्रक्रिया कार्यान्वित केली नाही. त्यामुळे सदर गावांतील तेंदूपत्ता विक्रीसाठी आवश्यक मदत उपलब्ध करविण्यासाठी वन विभागाने इच्छुक खरेदीदारांकडून बंद लिफाफ्यात निविदा आमंत्रित केली. यात संपूर्ण निविदा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने क्रियान्वित करण्यात आली.
यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत निविदा प्रक्रिया संचालित करण्यात आली. या निविदामध्ये त्या गावातील सध्याच्या बाजार भावानुसार चांगले व अधिक दर प्राप्त झाले. परंतु मिळालेले दर स्वीकारणे किंवा नाकारण्याचे पूर्ण अधिकार ग्रामसभेला असल्याने, ग्रामसभेला प्राप्त दर स्वीकारण्याबाबत निर्णय घेण्यासाठी प्राप्त सर्व निविदा सामूहिक वन अधिकार मान्य ग्रामसभेला हस्तांतरित करण्यात आल्या. वन विभागाकडून करण्यात आलेली कार्यवाही पूर्णत: कायद्यानुसार अवलंबलेली आहे. तसेच वन विभाग गोंदियाकडून उपलब्ध केलेल्या सहाय्याने अविक्रीत राहिलेल्या चुटिया (लोधीटोला), तेढा, कोयलारी, गोपालटोली, पांढरी, महाका व येडमागोंदी या सात वनहक्क मान्य गावातील तेंदूपाने विक्रीसाठी आजच्या बाजारभावानुसार एकूण एक कोटी १० हजार २९५ रूपये उच्चतम निविदा किंमत प्राप्त झालेली आहे.
वन विभागाकडून वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक सहकार्य संबंधित सामूहिक वनहक्क मान्य ग्रामसभांना करण्यात आले. तेंदूपत्ता हा एक महत्वाचा गौण वनोपज असून मोठ्या प्रमाणात गावकरी यावर निर्भर आहेत. तेंदूपत्ता संकललनाच्या कामापासून जिल्ह्यात ४५ हजार मजूर कुटुंबांना तेंदूपाने संकलनासाठी मजुरी व बोनस वाटप करण्यात येते. त्यामुळे पारदर्शक विक्री प्रक्रिया राबवून गावकऱ्यांना योग्य किंमत मिळवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात आले आहे.
उर्वरित ३१ वनहक्क मान्य गावांतील तेंदूपानांची विक्री ही ‘ग्रुप आॅफ ग्रामसभा’ या घटकाने अपारदर्शक पद्धतीने बाजार किंमतीच्या तुलनेत अत्यंत कमी दरात देवरी तालुक्याकरिता नऊ हजार ३१२ रूपये प्रति प्रमाण गोणी व सडक-अर्जुनी तालुक्याकरिता आठ हजार ३३१ रूपये प्रति प्रमाण गोणी विक्री केलेला आहे. वन विभाग गोंदियाच्या वतीने वनहक्क मान्य गावातील तेंदूपाने विक्रीसाठी ग्रामसभेच्या अधिकारात बाधा आणण्यात येत नसल्याचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

सात गावातील तेंदूपानांना मोठा दर
वन विभागाद्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या सहायतेमुळे तेंदूपाने विक्री करणाऱ्या सात वन अधिकार मान्य गावांत तेंदूपाने विक्रीसाठी आजच्या बाजारभावानुसार सर्वाधिक दर मिळाले आहे. यात गोंदिया तालुक्याच्या चुटिया (लोधीटोला) येथे घोषित उत्पादन १४० बॅग, प्रति बॅगचा दर ११ हजार ५८३ व निविदा दर १६ लाख २१ हजार ६२०, गोरेगाव वनक्षेत्रातील तेढा येथे २५ बॅग, प्रति बॅगचे दर १० हजार ५३९ व निविदा किंमत दोन लाख ६३ हजार ४७५, सडक-अर्जुनी येथील कोयलारी येथे १२० बॅग, प्रति बॅगचे दर १३ हजार ६८९ रूपये व प्राप्त निविदा दर १६ लाख ४२ हजार ६८०, पांढरी येथे पाच बॅग, प्रति बॅगचे दर १३ हजार २२१ व प्राप्त निविदा दर ६६ हजार १०५, तसेच सडक-अर्जुनी येथील गोपालटोली येथे पाच बॅग, प्रति बॅगचे दर १३ हजार २२१ व प्राप्त निविदा दर ६६ हजार १०५, देवरी वनक्षेत्राच्या महका-चिचगड येथे ८० बॅग, प्रति बॅगचे दर १५ हजार ५५२ व निविदा दर १२ लाख ४४ हजार १६०, देवरी तालुक्याच्याच येडमागोंदी येथे ३५० बॅगसाठी प्रति बॅगचे दर १४ हजार ५८९ व निविदा दर ५१ लाख सहा हजार १५० रूपये, अशी एकूण एक कोटी १० हजार २९५ निविदा किंमत आहे.

Web Title: 'Those' seven villages benefited from tendulkar marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.