‘त्या’ निर्दयी माता-पित्याचा अद्यापही शोध नाही
By Admin | Updated: January 10, 2015 23:07 IST2015-01-10T22:57:13+5:302015-01-10T23:07:22+5:30
जयपुरीया यांच्या नर्सिंग होम लगत एक खुल्या प्लॉटमध्ये नवजात चिमुकलीला बेवारस टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप

‘त्या’ निर्दयी माता-पित्याचा अद्यापही शोध नाही
गोंदिया : गेल्या ४ जानेवारी रोजी शहरातील सिव्हील लाईनमधील डॉ.
जयपुरीया यांच्या नर्सिंग होम लगत एक खुल्या प्लॉटमध्ये नवजात चिमुकलीला बेवारस टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तिला बेवारस टाकणाऱ्या निर्दयी माता-पित्यांचा अद्याप थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अशात येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने पोलीस अधिक्षक शशीकुमार मिना यांना निवेदन देत त्वरीत शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
४ जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता दरम्यान उघडकीस आलेल्या या प्रकरणात कुत्र्यांनी तिचे लचके तोडण्याचा प्रयत्न करून डोक्यासह हात पायांवर चावा घेतला होता. जखमी अवस्थेत परिसरातील काही तरूणांनी ‘तिला’ बीजीडब्ल्यु रूग्णालयात उपचारार्थ भर्ती केले होते. मात्र डोळ््याला जबर इजा असल्याने तसेच कडाक्याच्या थंडीत पडून असल्याने तिचे शरीर थंड पडले होते व तिची प्रकृती गंभीर होती. मात्र तिला नागपूरला पाठविण्याची योग्य ती व्यवस्था होत नसल्याने त्या चिमुकलीवर येथेच उपचार सुरू होते. अशात मानवाधिकार संघटनेने पुढाकार घेऊन तिला नागपूरला हलविण्यासाठी प्रयत्न केले.
परिणामी तिला नागपूरला हलविण्यात आले व तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र हे अमानवीय कृत्य करणाऱ्यांचा शोध न लागल्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष टिकेश्वर मिश्र, उपाध्यक्ष सचिन ठाकूर, महासचिव रोहीत अरोरा, सचिव प्रशांत वडेरा, सहसचिव तरंग जायस्वाल, शानू काळे, नवीन जोशी, आकाश पुरोहीत, रविराज ठाकूर, प्रथम माधवानी आदींनी पोलीस अधिक्षक मिना यांना निवेदन देऊन शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)