‘त्या’ दारूच्या बाटल्या बाहेरच्या लोकांच्या

By Admin | Updated: February 22, 2017 00:20 IST2017-02-22T00:20:16+5:302017-02-22T00:20:16+5:30

जयस्तंभ चौकातील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात सोमवारी आढळलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांशी

'Those' people outside the liquor bottles | ‘त्या’ दारूच्या बाटल्या बाहेरच्या लोकांच्या

‘त्या’ दारूच्या बाटल्या बाहेरच्या लोकांच्या

उपवनसंरक्षक रामगावकर : महिनाभरात कार्यालयच हलविणार
गोंदिया : जयस्तंभ चौकातील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात सोमवारी आढळलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संबंध नसून कार्यालयाबाहेरील दारूड्या लोकांचे ते कृत्य आहे, असे उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मंगळवारी सदर बातमी सचित्रपणे लोकमतला आणि व्हिडीओसह लोकमत आॅनलाईन आवृत्तीत प्रकाशित झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ स्तरावरूनही यासंदर्भात वनाधिकाऱ्यांना विचारणा झाल्याची माहिती आहे. दरम्यान हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कोणती काळजी घेणार याबाबत उपवनसंरक्षक रामगावकर यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या कार्यालयाच्या आवारात कोणतेही कर्मचारी रात्री वगैरे मद्यप्राशन करीत नसल्याचे सांगितले. मात्र कार्यालयाच्या मागील बाजुकडील वाहनांसाठी असलेले गेट जयस्तंभ चौकात उघडते आणि तिथेच दारू दुकान आहे. त्यामुळे बाहेरील लोक कधी उघड्या असणाऱ्या त्या फाटकातून आत येऊन मद्यप्राशन करून तिथे रिकाम्या बाटल्या टाकत असण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तविली. रात्रीला चौकीदार राहात असला तरी तो एकटा सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे वनविभागाचे हे कार्यालय अवघ्या महिनाभरात कायमस्वरूपी अशा आपल्या स्थायी जागेत स्थानांतरित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'Those' people outside the liquor bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.