कोडेलोहारातून हलली ‘त्या’ विदेशी ठगांची सूत्रे

By Admin | Updated: November 1, 2015 02:14 IST2015-11-01T02:14:34+5:302015-11-01T02:14:34+5:30

दुबई व कुवैत देशात नोकरी लावणे व नकली पारपत्र (विजा) बनवून अनेकांना लाखो रुपयांनी ढगविण्याच्या ....

'Those' foreign smugglers | कोडेलोहारातून हलली ‘त्या’ विदेशी ठगांची सूत्रे

कोडेलोहारातून हलली ‘त्या’ विदेशी ठगांची सूत्रे

एकाला अटक : खात्यात आढळले ९० लाख
वडेगाव : दुबई व कुवैत देशात नोकरी लावणे व नकली पारपत्र (विजा) बनवून अनेकांना लाखो रुपयांनी ढगविण्याच्या प्रकरणाची संपूर्ण सुत्रे तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा येथून हलल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान सदर प्रकरणातील एका आरोपीस शुक्रवारी (दि.३०) अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपीचे नाव अरुणसिंह वल्द विरेंद्रसिंग (३१) रा. मडाळ पो.ससापूर ता. गोला जि.गोरखपूर (उत्तर प्रदेश) असे आहे. त्याच्या बँक खात्यात सुमारे ९० लाख रुपये आढळल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजकुमार सुकुल साहानी (३३) (उत्तर प्रदेश) अद्याप फरार आहे. अटक झालेल्या आरोपीस मुंबई सीएसटी येथील त्याच्या ई-ट्रस्ट नावाच्या कार्यालयातून ठाणे पोलिसांनी अटक केली. दि.३० रोजी त्यास तिरोडा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. सदर आरोपीने ढगलेल्या युवकांची मुलाखत घेतल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार राजकुमार साहानी याने संपूर्ण सूत्रे कोडेलोहारा येथून हलविल्याचे उघडकीस आले आहे. कोडेलोहारा येथील रहिवासी गंगेश्वर पृथ्वीराज पटले (२३) हा युवक जुलै २०१५ ला रोजगारासाठी जगशेदपूर येथे गेला असता त्याची आरोपी राजकुमारसोबत भेट झाली. त्यावेळी राजकुमारने गंगेश्वरला मदत केली. पुढे त्याच भेटीतून दोघांची जवळीक साधली. सप्टेंबरपासून दोन महिने आरोपी गंगेश्वर पटले याच्या घरीच थांबला. तेथे राहून त्याने वडेगाव परिसरातील बहुतांश गावे पिंजून काढली व सुमारे १५० युवकांना आपल्या फास्यात अडकविले.
दरम्यान, आरोपीने तिरोडा येथील लॅबमधून युवकांची शारीरिक तपासणी, बिर्सी येथून एक्सरे काढले तर कॅफेतून रंगीत झेरॉक्स काढून त्याने बोगस पारपत्र, एअरवेज व एअर इंडियाच्या विमानाची बोगस तिकीटे व बोगस करारपत्र तयार केले. विमान तिकीटे दिली. त्यानंतर आपल्या नियोजित कार्यक्रमात फेरबदल करीत त्यांना २७, २८ व २९ आॅक्टोबरची तिकिटे दिली. आॅक्टोबर महिन्यात त्याने कोडेलोहारा हे स्थळ सोडत आपला मुक्काम बिर्सी येथील एका हॉटेलमध्ये हलविण्याचे वृत्त आहे. दरम्यान तिरोडा पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत असून यात आणखी काय समोर येते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: 'Those' foreign smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.