शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

तंत्रज्ञानाचा वापर करून अशी होते गुन्ह्यांची उकल ! तंत्रज्ञान पोलिसांसाठी ठरतेय वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:00 IST

Gondia : सीसीटीव्ही'मुळे शेकडो गुन्हे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे गुन्ह्यांचा छडा लावण्याचा वेगदेखील वाढला आहे. विशेषतः शहरात ठिकठिकाणी लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक तपासाची पोलिसांना मोठी मदत होत आहे. हे तंत्रज्ञानपोलिसांसाठी वरदानच ठरत आहे. याच्याच मदतीने अनेक मोठ्या गंभीर गुन्ह्यांसह हजाराहून अधिक प्रकरणांत आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये शहरात हत्या, घरफोडी, महिला अत्याचार, चोरी, वाहनचोरी या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. याशिवाय अगोदरच्या गुन्ह्यांचा तपासदेखील प्रलंबित होता. अशा पद्धतीने पोलिसांच्या मागे तपासाची डोकेदुखी वाढली. मात्र, सीसीटीव्हीमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करीत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे.

कुठलाही दुवा नसताना केवळ या तिसऱ्या डोळ्यामुळे आरोपींचा तपशील, चेहरा, दुचाकी किंवा कारचा क्रमांक आढळतो. त्याच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचतात. मागील आठवड्यात एका घरफोडी करणाऱ्या आरोपींचा कुठलाही दुवा नसताना केवळ सीसीटीव्हीच्या मदतीमुळे शोध लागू शकला. सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी करून पोलिसांनी आरोपींचा दुचाकी क्रमांक शोधला व त्याआधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

३३ टक्के चोऱ्यांतील आरोपींना पकडलेगोंदिया जिल्ह्यात मागच्या वर्षात दोन दरोडे, ११ जबरी चोरी, २० दिवसा घरफोडी, १०१ रात्र घरफोडी व ३६३ चोऱ्या झाल्या आहेत. यात कोट्यवधीची संपत्ती चोरीला गेली आहे. या प्रकरणात ३० टक्के चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.

कार्यपद्धती बदलल्याने पोलिसांच्या हाताला यश शहरातील बहुतांश पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सीसीटीव्हीचे जाळे आहेत. याशिवाय मोठ्या गुन्ह्यांमध्ये पोलिस सायबर सेलच्या मदतीने ई- सर्व्हेलन्सवर भर देतात. त्याला खबऱ्यांच्या नेटवर्कची देखील जोड मिळते. कार्यपद्धतीत बदल केल्याने पोलिसांना यश मिळत आहे.

बलात्कारीही अटकेत गोंदिया जिल्ह्यात महिलासंदर्भात गुन्हे वाढत आहेत. ८९ मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंद आहेत. ११४ महिला-मुलींचा विनयभंग झाला आहे. १२५ मुली, महिलांचे अपहरण झाले आहेत. बलात्कार व विनयभंगातील ९८ टक्के आरोपी अटकेत आहेत.

आरोपीही लढवितात विविध शक्कल अनेकदा गुन्हेगार गुन्ह्यात वापरलेला मोबाइल किंवा सीमकार्ड फेकून देतात. अशा वेळी त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण होते. पोलिसांच्या हातात लागू नये यासाठी आरोपीही विविध शक्कल लढवितात.

तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत आता पोलिसांना तपासात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होते. मोबाइलवरून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येते. तपास कार्य जलद करण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीसाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञान आहे.

गुन्हे न उकलण्याची मुख्य कारणे काय? तंत्रज्ञानाची मदत असतानादेखील काही गुन्हे उकलण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सीसीटीव्हीच्या रेंजमध्ये न झालेले गुन्हे किंवा दाट वस्तीत झालेल्या गुन्ह्यांचा यात जास्त प्रमाणात समावेश आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाPoliceपोलिसtechnologyतंत्रज्ञान