तिसऱ्या टप्प्यांत २० गावे व १३ वाड्यांत पाणी टंचाई

By Admin | Updated: April 25, 2017 00:44 IST2017-04-25T00:44:06+5:302017-04-25T00:44:06+5:30

अंगाची लाहीलाही होत असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठे-कुठे आहे याचा आढावा जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला.

In the third phase, water scarcity in 20 villages and 13 stoves | तिसऱ्या टप्प्यांत २० गावे व १३ वाड्यांत पाणी टंचाई

तिसऱ्या टप्प्यांत २० गावे व १३ वाड्यांत पाणी टंचाई

जि.प.ने केल्या उपाययोजना : पहिला व दुसरा टप्पा निरंक
गोंदिया : अंगाची लाहीलाही होत असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठे-कुठे आहे याचा आढावा जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला. यात तिसऱ्या टप्प्यात २० गावे व १३ वाड्यांत पाणी टंचाई आढळली. त्या गावांत उपाययोजना म्हणून इनवेल बोअर, विंधन विहीरी व नळ योजना विशेष दुरूस्ती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची उत्तम अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली. टंचाई सदृश गावात पाण्याची समस्या मिटू लागली. याचाच परिणाम गोंदिया जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या टप्यात गोंदिया जिल्ह्यात कुठेच पाणी टंचाई आढळली नाही. तिसऱ्या टप्यात २० गावे व १३ वाड्यांमध्ये ही टंचाई आढळलेली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज आहे.
गोंदिया तालुक्यातील १ गाव व ३ वाड्या, गोरेगाव तालुक्यातील ४ गाव व १ वाडी, सडक-अर्जुनी तालुक्यातील २ गाव व ३ वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एक गाव व एक वाडी, तिरोडा तालुक्यातील एक गावे, सालेकसा तालुक्यातील एक गाव व ४ वाड्या, देवरी तालुक्यातील ३ गावे व एक वाडी, आमगाव तालुक्यातील ४ गावे टंचाई ग्रस्त आढळले.

२५ विहिरींमध्ये बोअर
जिल्ह्यात २० गावे १३ वाड्या पाणी टंचाईग्रस्त आहेत. या गावांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ३३ उपाययोजना तयार केल्या असून २५ ठिकाणी विहिरींमध्ये बोअर, सात ठिकाणी विंधन विहीरी, एका नळ योजनेची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे.

Web Title: In the third phase, water scarcity in 20 villages and 13 stoves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.