गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमध्ये चोरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 02:14 IST2016-02-11T02:14:38+5:302016-02-11T02:14:38+5:30
गोंदिया-चांदाफोर्ट या मार्गावर रेल्वे प्रवासी गाडीमध्ये अनेक दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. नित्यनियमाने मोबाईल पॅकेट चोरीचा प्रकार सुरू आहे.

गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमध्ये चोरांचा सुळसुळाट
बाराभाटी : गोंदिया-चांदाफोर्ट या मार्गावर रेल्वे प्रवासी गाडीमध्ये अनेक दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. नित्यनियमाने मोबाईल पॅकेट चोरीचा प्रकार सुरू आहे.
बुधवार (दि.१०) रोजी सकाळी अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ९.३० चोरांना प्रवाशांच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
आतापर्यंत धावत्या रेल्वेमध्ये प्रकरण घडत होते. परंतु रेल्वे प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे प्रवासी सांगतात. अशा चोरीच्या प्रकारामध्ये अनेकांचे मंगळसूत्र, मोबाईल, लॅपटॉप, पैशाचे पॉकेट चोरी होतात. यामध्ये प्रवाशांचे खूपच नुकसान होते. असे प्रकार घडतेवेळी रेल्वे पोलीस हजर राहत नाही. याच संधीचा फायदा घेत चोरीचे प्रकरण रेल्वेत वाढत आहेत. या चोरांमध्ये तरूण मुला-मुलींचा समावेश आहे.
अर्जुनी-मोरगाव येथे पकडण्यात आलेल्यांमध्ये मुलगी-मुलगा असे चोर मिळाले आहेत. अशा चोरांचा बंदोबस्त करून मोफत प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांची आहे. या चोरांचे मुख्य ठिकाण हिरडामाली, गोंगले, गोंदिया, वडसा, सौंदड अशा ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)