ते मोटारसायकल चोरटे दुसऱ्या गुन्ह्यात सहभागी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:15+5:302021-03-23T04:31:15+5:30
गोंदिया : मागील अनेक दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीला जात आहे. या टोळीच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होते. ...

ते मोटारसायकल चोरटे दुसऱ्या गुन्ह्यात सहभागी ()
गोंदिया : मागील अनेक दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीला जात आहे. या टोळीच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होते. पोलिसांनी या मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करताना २० मार्चला चुलोद परिसरातून आराेपी सचिन ऊर्फ सोनू ठाकूर व आनंद राहांगडाले या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. (एम.एच.३५ व्ही १२२७, एम.एच.३५ क्यू ८४४६) व एक विना क्रमांकाची मोटारसायकल आहे. या दोन आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्या आरोपींना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना विविध गुन्ह्यांत अटक करून त्यांची चौकशी केली जाणार आहे.