‘ते’ करतात २५ वर्षापासून लोकजागृतीचे कार्य
By Admin | Updated: November 7, 2016 00:23 IST2016-11-07T00:23:19+5:302016-11-07T00:23:19+5:30
गावागावात आता दिवाळीनंतर मंडई जत्रा यांचे आयोजन होत आहेत. अशाच कार्यक्रमाचे आयोजन ग्राम लोहारा (तिरखेडी) येथील लोककलावंत शाहीर भाऊराव बावणे हे आपल्या संचासह करीत आहेत.

‘ते’ करतात २५ वर्षापासून लोकजागृतीचे कार्य
मनोरंजन ग्रामस्थांचे : भाऊलाल बावणे आणि त्यांचा संच
बिजेपार : गावागावात आता दिवाळीनंतर मंडई जत्रा यांचे आयोजन होत आहेत. अशाच कार्यक्रमाचे आयोजन ग्राम लोहारा (तिरखेडी) येथील लोककलावंत शाहीर भाऊराव बावणे हे आपल्या संचासह करीत आहेत. विविध प्रकारचे लोकजागृतीचे कार्यक्रम मागील २५ पेक्षा अधिक वर्षापासून ते करीत आहेत.
मंडई जत्रेमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्रीच्या वेळी गावकऱ्यांसाठी व आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी ठेवल्या जातात. यात मराठी नाटकाचे प्रयोग, छत्तीसगडी धमाके, दंडार व नृत्य गाण्याचे कार्यक्रम प्रामुख्याने असतात. लोककलावंत शाहीर भाऊराव बावनेकर हे आपल्या संचासह लोकजागृतीचे कार्यक्रम मागील २५ वर्षापासून करीत आहेत. परंतु त्यांना गावचा कलाकार म्हणून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. तरी ते मोठ्या उत्साहाने मनोरंजनपर जनजागृतीचे कार्यक्रम राबवित आहेत.
त्यात पोवाडा, भजन, दंडार यासारख्या माध्यमातून त्यांनी ग्राम स्वच्छता, हागणदारीमुक्त गाव, पर्यावरण व्यसनमुक्ती, स्त्रीभृण हत्या व महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर नकल करुन लोकजागृती करीत आहेत. त्यांचे इतर सहयोगी कलावंतही हौसेने त्यांना साथ देत आहेत. अशाच एका कार्यक्रमाचे सादरीकरण करताना आपल्या साथीदारासह लोहारा गावी त्यांनी कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला पाटील नारायण कटरे, सरपंच आर.डी. रहांगडाले, वसंत राणे, रोशनलाल राणे, पोलीस पाटील सुरेश चौधरी, युवराज कटरे आदी उपस्थित होते. सर्वांनी सदर कलावंतांचे मनभरून कौतुक केले. (वार्ताहर)