डेल्टा प्लसचे ते दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST2021-08-13T05:00:00+5:302021-08-13T05:00:01+5:30

गोंदिया जिल्ह्यातील २० कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने चाचणीसाठी पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे जून महिन्यात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी (दि. ११) रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. मात्र हे दोन्ही रुग्ण आता पूर्णपणे बरे झालेले आहे. 

They both became patients of Delta Plus completely cured | डेल्टा प्लसचे ते दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे

डेल्टा प्लसचे ते दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेन्सिंग) नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. याच अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २० कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने चाचणीसाठी पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे जून महिन्यात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी (दि. ११) रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. मात्र हे दोन्ही रुग्ण आता पूर्णपणे बरे झालेले आहे. 
डेल्टा प्लसच्या अनुषंगाने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित रुग्णांपैकी २० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे नियमित पाठविले जातात. 
जून महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे २० कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. यापैकी १ रुग्ण सडक अर्जुनी आणि १ रुग्ण सालेकसा तालुक्यातील आहे.  अहवाल प्राप्त होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला. 
अहवाल येईपर्यंत हे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे फारशी काळजी करण्याची गरज नाही. 
मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दोन रुग्णांचा अहवाल डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह आल्याने हे रुग्ण आढळलेल्या गावातील सर्वच नागरिकांचे नमुने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने या दोन्ही गावांत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. या दोन्ही गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बाेलताना सांगितले. 

दोन्ही रुग्णांची हिस्ट्री तपासणार 
- डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांच्या प्रवासाचा संदर्भ याची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचेसुद्धा नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. 
एका रुग्णामागे शंभर जणांचे नमुने टेस्ट करणार 
- काेरोनापेक्षा डेल्टा प्लसचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या शंभर जणांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर वाढविण्यावरसुद्धा भर देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
 

 

Web Title: They both became patients of Delta Plus completely cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.