अशोकाच्या वेळी जाती नव्हत्या
By Admin | Updated: April 1, 2015 00:54 IST2015-04-01T00:54:38+5:302015-04-01T00:54:38+5:30
२ हजार २३४ वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात जैन, बौध्द, आजीवक, ब्राह्मण यांच्यामुळे संप्रदाय होते, परंतु जाती नव्हत्या.

अशोकाच्या वेळी जाती नव्हत्या
बाराभाटी : २ हजार २३४ वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात जैन, बौध्द, आजीवक, ब्राह्मण यांच्यामुळे संप्रदाय होते, परंतु जाती नव्हत्या. याचे कारण म्हणजे सम्राट अशोक हे एक कल्याणकारी राजा होते, असे प्रतिपादन सत्यजीत मौर्य यांनी केले.
येथे शनिवारी फुले, शाहू, आंबेडकर युवा साहित्य संमेलन उत्साहार पार पडले. उद्घाटन दिलवरभाई रामटेके यांच्या हस्ते सत्यजीत मौर्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या वेळी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक डॉ.युवराज मेश्राम, अॅड.संदेश भालेकर, डॉ. प्रदीप भानसे, संजय मगर, वैशाली रामटेके, भागवत लांडगे, हरिचंद्र लाडे, टी.एस. माटे, एम.एम. राखडे, एम.जी. मेश्राम, तलाठी रंगारी, कावळे, बागडे, ओमप्रकाश नशिने, हेमलता खोब्रागडे, करूणा नंदेश्वर, राजाराम बेलखोडे, मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
मौर्य पुढे म्हणाले की, वैचारिक क्रांतीचा युवा घडवा. त्यांना मंच द्या. कार्यक्रमाला अधिकारी आले नाही, ही त्यांची कमजोरी आहे. ज्यांच्या कमाईने आज आपण जीवन जगतो, त्यांनाच विसरणे चुकीचे आहे.
बुध्दांचे अनुयायी सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, मानसाला माणुसकीचे हक्क मिळवून देणारे बहुजनांचे नायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.
उद्घाटनपर भाषणात रामटेके म्हणाले, सामाजिक संवेदना बोथड झाल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांना मानणाऱ्या अनुयानांनी परिवर्तनवादी विचार संमेलनात सहभागी व्हावे. विचारवंतांमध्ये माणसे जोडण्याची शक्ती आहे, असे ते म्हणाले.
खेड्यापाड्यातून स्वत:च्या बुद्धीसामर्थ्यावर ज्यांनी नोकरी मिळविली, अशांचा भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सायंकाळी सिद्धार्थ गौतमा हा चित्रपट व विजय भारती यांच्या प्रबोधनात्मक कव्वालीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रियदर्शी बौध्द सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्ताने सदर कार्यक्रम घेण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष विनोद माने यांनी आपल्या भाषणात सांगितले.
संचालन प्रा. अनिल कानेकर (लाखांदूर), प्रास्ताविक महेंद्र बंसोड तर आभार भागवत लांडगे यांनी मानले. (वार्ताहर)