जगात भूत व भानामती नाहीच- चव्हाण
By Admin | Updated: December 16, 2015 02:03 IST2015-12-16T02:03:57+5:302015-12-16T02:03:57+5:30
या जगात भूत, भानामती, मंत्र-तंत्र, चेटूक, चमत्कार, देवी अंगात येणे, ज्योतिष बुवाबाजी अजिबात नाही.

जगात भूत व भानामती नाहीच- चव्हाण
नवेगावबांध : या जगात भूत, भानामती, मंत्र-तंत्र, चेटूक, चमत्कार, देवी अंगात येणे, ज्योतिष बुवाबाजी अजिबात नाही. या सर्व अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे जनतेने या बाबींना मुळीच घाबरू नये, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोंदियाचे जिल्हाध्यक्ष एस.एस. चव्हाण यांनी केले.
नत्थुजी पुस्तोडे अनुसूचित आदिवासी आश्रम शाळा देवलगाव येथे विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोना विरोधी कायदा याविषयी ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानगी प्राचार्य एम.पी. कुरसुंगे होते. अतिथी म्हणून मुख्याध्यापक एम.एस. कापगते, प्रा.एच.एस. झाडे, प्रा. बोरकर, प्रा. लंजे, प्रा. पाटणकर, प्रा. खुले, व्ही.एस. लांजेवार उपस्थित होते.
शालेय जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विकास व्हावा. ढोंगी बुवा-बाबांपासून समाजाला दूर ठेवावे, केवळ अंधश्रद्धांच्याच बाबतीत नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रांकडे बघण्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण प्रत्येकामध्ये रूजला पाहिजे, असेही ते म्हणाले.याप्रसंगी माचिसविना आग लावणे, जिभेत लोखंडी रॉड फसविणे, कानाने चिठ्ठ्यांवरील नाव वाचने, नोटेत रिबिन गायब करणे, अंगातील देवी काढणे, जळता कापूण खाणे इत्यादी प्रयोग एस.एस. चव्हाण यांनी सादर केले. तसेच त्या प्रयोगांची कृतीदेखील सांगितली.
संचालन व आभार एस.एम. चाचीरे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)