शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचे भय नाही गावाला पोहचायच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

डोक्यावर चिमुरडे व जिवन प्रपंचाचे ओझे वाहत हे तांडे दररोज प्रवास करीत आहेत. ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना पोटभर खायला अन्न तरी दरमजल करत गावाची ओढ त्यांना सतावित आहे. शुक्र वारी (दि.८) अचानक अर्जुनी मोरगाव-वडसा मार्गावर एका स्थलांतरित मजुरांच्या तांड्याची भेट झाली. दुपारच्या प्रहरी सूर्य आग ओखत होता. रखरखते उन्ह होती. माँ पेट्रोल पंपसमोर एक तांडा येऊन थबकला.सर्वांग घामानं भिजलेलं होत.

ठळक मुद्देमजुरांची महामार्गावरून पायपीट सुरूच : रेल्वे मार्गाने पायी धोकादायक प्रवास

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : देशात अगदी पहिला लॉकडाऊन लागू झाला तेव्हापासून तर आजतागायत स्थलांतरित मजुरांच्या तांडयांचे आवागमन सुरूच आहे. हजार-बाराशे कि.मी.पायी चालत त्यांच मार्गक्रमण सुरू आहे. आम्हाला मृत्यूच भय नाही, बस कोणत्याही परिस्थितीत गावाला पोहचायचय अशा मजुरांच्या प्रतिक्रि या आहेत.डोक्यावर चिमुरडे व जिवन प्रपंचाचे ओझे वाहत हे तांडे दररोज प्रवास करीत आहेत. ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना पोटभर खायला अन्न तरी दरमजल करत गावाची ओढ त्यांना सतावित आहे. शुक्र वारी (दि.८) अचानक अर्जुनी मोरगाव-वडसा मार्गावर एका स्थलांतरित मजुरांच्या तांड्याची भेट झाली. दुपारच्या प्रहरी सूर्य आग ओखत होता. रखरखते उन्ह होती. माँ पेट्रोल पंपसमोर एक तांडा येऊन थबकला.सर्वांग घामानं भिजलेलं होत. पायाच्या पोटरीत गोळे व फोड आलेली होती.डांबरी रस्त्याने चालून चालून पादत्राणे झिजली होती. थकलेले पाय व क्षीण झालेले शरीर, अंगात कुठलेही त्राण नव्हते. त्यांच्या या वेदना पाहवत नव्हत्या. बल्लारशा-गोंदिया या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मजुरांच्या तांड्यातील एकाचा सौंदड नजीक रेल्वे धडकेत मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.८) औरंगाबादजवळ रेल्वे अपघातात १६ मजुरांचा मृत्यू झाला.मजुरांचे हे मृत्यू तांडव सुरूच आहे. तांड्यात फिजीकल डिस्टन्स पाळले जात नसल्याने या मजुरांना कोरोना विषाणू संक्र मणाची भीती आहे. अंर्तमनात भीती असली तरी त्यांचा निर्धार एकच आहे मातृभूमीला स्पर्श करण्याचा. सीमेपार मरण्यापेक्षा गावात मेल्यावर सगेसोयरे तरी धावून येतील असा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्यात आहे. याच भरोश्यावर ते शेकडो कि.मी.चा प्रवास करुन गावाकडे परतत आहे.स्वयंसेवी संस्थाच आमचा आधारलॉकडाऊनमुळे हैद्राबाद व इतर राज्यात अडकलेले मजूर आता पायीच आपल्या गावाकडे परतत आहे. रोजगार गेल्याने आणि कंपनी मालकाने सुध्दा हातावर केल्याने त्यांच्याजवळ उदरनिर्वाहासाठी पैसे नाही. अशात शेकडो कि.मी.च्या पायी प्रवासात या मजुरांना स्वंयसेवी आणि सामाजिक संस्थाकडून मदत होत आहे. कुणी जेवणाची तर कुणी पैशाची मदत करीत आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थाच आमचा आधार असल्याचे हे स्थलांतरीत मजूर सांगत आहेत.ऑनलाईन नोंदणी करणे ठरते अडचणशासनाने विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या स्वगृही सोडण्यासाठी रेल्वे गाड्या आणि बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी मजुरांना नोंदणी करावी लागत आहे. मात्र बºयाच मजुरांना याची माहिती नसल्याने आणि आॅनलाईन प्रक्रिया ही किचकट असल्याने त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.आमचा गावच बरालॉकडाऊन लागू झाला. कंपनीच्या मालकाने कामावरुन काढले. बेरोजगारी व उपासमारीचे संकट ओढवले. लॉकडाऊन उघडेल म्हणून काही दिवस वाट पाहिली. लॉकडाऊन उघडलेच नाही.शेवटी कुटुंबासह गावाकडे जाण्याचे ठरविले. सीमाबंदीमुळे कोरोनाच्या भयापेक्षा रस्त्यावरची भीती वाटू लागली. आता एकदा परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. काहीही झाले तरी चालेल पण गावाकडे जाऊच.- प्रकाश पटेल, भलपहारी ( छत्तीसगड)प्रवासात महायातनालॉकडाऊनमुळे दुकाने बंद. सोबत लहान लेकरं. सामानाचं ओझं वाहून नेणं अवघड आहे. खिशात पैसा नाही. खायला अन्नधान्य नाही. मिळेल ते खायचं व पुढे जायचं. रात्री ८ वाजतापासून प्रवास करायचा. दुपारी विश्रांती करायची. पुन्हा ६ वाजता निघायचं. जिथे रात्र होईल तिथे थांबायचं. पायावर गोळे, सूज असते पण वेदना सांगायच्या कुणाला? इकडंतिकडं मरण्यापेक्षा आपल्या गावातच मरू. निदान सगेसोयरे तर अंतिमसंस्कार करतील. यापुढे अशा यातना नको रे बाबा.- गोपाल मिसाद, बालाघाट (मध्यप्रदेश)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या