अतिवृष्टीग्रस्त ९५० शेतकऱ्यांना अद्याप मदत वाटप नाही
By Admin | Updated: September 9, 2014 00:28 IST2014-09-09T00:28:01+5:302014-09-09T00:28:01+5:30
गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा

अतिवृष्टीग्रस्त ९५० शेतकऱ्यांना अद्याप मदत वाटप नाही
खातिया : गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा येथील बँक आॅफ इंडियाअंतर्गत खाते उघडले असताना ९५० शेतकऱ्यांना ती मदत मिळालीच नाही. त्यामुळे या बँक अंतर्गत येणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
बँकेत गेल्यानंतर येथील कर्मचारी पटवारी कार्यालयात शेतकऱ्यांना पाठवत आहेत. पटवारी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी व त्यांचे खाता नंबर हे ही संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. एक वर्ष होत चालले आहेत. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीकडे कोणाचेही लक्ष नाही.
कामठा सर्कलअंतर्गत येणारे गाव खातीया, बिरसी, मोगर्रा, कामठा, पांजरा, झीलमिली, परसवाडा, ईर्री, नवरगाव, छिपीया व परिसरातील अनेक गावाच्या शेतकऱ्यांचे खाते हे कामठा बँक आॅफ इंडिया येथे उघडलेले आहेत. पण आतापर्यंत शेतकऱ्यांना मदतीचे पैसे मिळत नसल्याने ते बँकामध्ये जाऊन जाऊन त्रस्त झाले आहेत. वरील माहिती देताना बिरसी येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी गोविंदसिंह पंडेले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीचे रुपये हे गेल्या कित्येक महिन्यांपासून संबंधित विभागाकडे जमा आहेत. पण आतापर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. ही विभागाची लापरवाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.