शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

जिल्ह्यात चार दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:00 AM

१९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र मागील चार दिवसात जिल्ह्यात नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. शिवाय कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मागील ११ दिवसांच्या कालावधीत एकूण ५८ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्हावासीयांना निश्चित दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देपुन्हा ६ जण झाले कोरोनामुक्त । आता जिल्ह्यात ११ अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र मागील ४ दिवसांत जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. तर शनिवारी (दि.६) पुन्हा ६ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील ६९ कोरोना बाधीतांपैकी ५८ जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता ११ अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधीत आहे. कोरोना बाधीत रुग्ण वाढीच्या संख्येला ब्रेक लागल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.१९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र मागील चार दिवसात जिल्ह्यात नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. शिवाय कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मागील ११ दिवसांच्या कालावधीत एकूण ५८ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्हावासीयांना निश्चित दिलासा मिळाला आहे. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या सहा रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यातील २, सडक-अर्जुनी तालुक्यातील ३ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ एका जणांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील १०९७ जणांच्या स्वॅबचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६९ जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले असल्याने निश्चितच ही दिलासा देणारी बाब आहे. जिल्ह्यातील विविध शाळा आणि संस्थामध्ये २१२४ आणि १८७९ जण होम क्वारंटाईन आहे.असे आहे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणजिल्ह्यातील कोरोनामुक्त होणाºयाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळेच मागील ११ दिवसांत एकूण ५८ जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यात २८ मे रोजी २, २९ मे रोजी २५, ३० मे रोजी ४, ३१ मे रोजी ६ रुग्णांना, १ जून रोजी ६, २ जून रोजी ४, ३ जून रोजी २, ५ जून रोजी २,६ जून रोजी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.मंगळवारी सुरू होणार प्रयोगशाळाकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रयोगशाळा गोंदिया येथे नव्हती. त्यामुळे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले जात होते. मात्र आता गोंदिया येथील स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. या प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीची ट्रायल देखील घेण्यात आली. त्यात नमुने तपासणीचे अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेशी जुडले. एम्सकडून यासाठी प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. आता केवळ आयसीएमआरकडून पासवर्ड आणि आयडी मिळाल्यानंतर मंगळवारपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या