शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांची’ दिवाळी अंधारात!

By admin | Updated: October 25, 2015 01:49 IST

जिल्ह्यात ८ आदिवासी आश्रम शाळा असून शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१५ पासूनचे ४ महिन्यांचे वेतन अडले आहेत.

वेतन अडले : आश्रमशाळांतील शिक्षकांचा उपोषणाचा इशारा करडी (पालोरा) : जिल्ह्यात ८ आदिवासी आश्रम शाळा असून शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१५ पासूनचे ४ महिन्यांचे वेतन अडले आहेत. आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला अनेकदा कळवूनही उपयोग झालेला नाही. वेतन अडल्याने शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या समस्येकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप संघटनेचा आहे.जिल्ह्यात ८ आदिवासी आश्रम शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तुमसर तालुक्यातील येरली, आंबागड, पवनारखारी, चांदपूर, त्याचबरोबर भंडारा तालुक्यातील कोका, पवनी तालुक्यातील आदर्श आमगाव, लाखनी तालुक्यातील माडगी, साकोली तालुक्यातील खांबा जांभळी या आश्रम शाळांचा समावेश आहे. सर्व शाळांमध्ये जवळपास २२५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र येथील कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी काम व उपासमारीची वेळ आली आहे.दिवाळी हा प्रकाशाचा सण काही दिवसांच्या अवधीवर आहे. सगळीकडे त्यादृष्टीने तयारी जोरात सुरू आहेत. मात्र येथील कर्मचाऱ्यात नाराजीचे वातावरण आहे. दिवाळीचा आनंद व्यक्त करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांना कठिनाईचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१५ पासूनचे ४ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. वेतनासंबंधीच्या मागण्या अनेकदा संबंधितांकडे करूनही प्रश्न अडून पडला आहे. शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणाचेही लक्ष नाही. शिक्षकांचे संपूर्ण कुटूंब त्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.सणाचे निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायचे की नाही गोड धोड करून उत्साह वाढवायचा कि नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ४ महिन्यांच्या उधारीमुळे दुकानदारही किराणा द्यायला तयार नाहीत. दुकानातून उधारी मिळण्यास मागे पुढे पाहिले जात आहे. घरांची साफ सफाई, रंगरंगोटी व दुरूस्तीचे कामे बंद पडली आहेत. आदिवासी प्रकल्प विभागाला अनेकदा यासंबंधाने कळविण्यात आले. परंतु विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांनाही याप्रकरणी कळविण्यात आले. त्यांनी नागपूर प्रकल्प आयुक्तांची भेट घेतली. त्यांना समस्या समजावून सांगितली. आ.गाणार यांचे सोबत शिक्षकांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते. मात्र समाधान निघाले नाही. आदिवासी प्रकल्प विभागाने दिवाळीपुर्वी वेतन अदा न केल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.