शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

तरुणाईला हवे चांगले शिक्षण, रोजगार तर वयोवृद्धांना रस्ते, आरोग्य सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:20 IST

गोंदियाकरांच्या निवडून येणाऱ्या आमदारांकडून अनेक अपेक्षा : शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या द्या

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी लोकशाहीच्या या महोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान पार पडणार आहे.

राज्यात नवमतदार अर्थात पहिल्यांदाच मतदान करणारे १८ वर्षांवरील मतदार ते ८० वर्षांवरील मतदारही आपला मतदानाचा हक्क बजावणार याच मतदारांच्या निवडणूक, निवडून येणारे आमदार, सत्ताधारी, विरोधकांकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा 'लोकमत'ने प्रयत्न केला. यात तरुणाईने चांगले शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या हव्यात, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तर वयोवृद्धांनी त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उद्यानांसह उच्चतम दर्जाच्या आरोग्यसेवेकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी केली. 

"माझे पहिले मतदान आहे. शिक्षणासाठी नागपूर, पुणे येथे जावे लागते. गोंदिया परिसरात शिक्षणाबाबत चांगल्या संस्था उभारणे गरजेचे आहे. नवतरुण, तरुणी उच्च शिक्षण तर घेतात; मात्र पुढे नोकरी मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. यासाठी आमचे सरकार हवे आहे."- लक्की हुकरे, तरुण मतदार, तेढा

"निवडणूक होते आणि दरवेळी आम्ही मतदान करीत आहोत; पण सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकायलाच तयार नाही. आमचे उतरते वय असल्याने आम्हाला आरोग्यसेवा चांगली हवी आहे. जिल्ह्यात चांगली सेवा मिळत नाही. वृद्धांना आजारपण दूर करण्यासाठी नागपूर गाठावे लागते. त्यासाठीही अनेकदा चकरा माराव्या लागतात. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे." - भाऊराव चिंचाळकर, विद्यानगरी, आमगाव.

"मतदान केंद्रावर पहिले पाऊल ठेवताना मनात एक वेगळाच उत्साह आणि जबाबदारीची भावना आहे. देशाच्या भवितव्यासाठी आपले मत किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव २० तारखेला प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. आपल्या हक्काचे संरक्षण आणि आपल्याला हवे असलेल्या व्यवस्थेसाठी उचललेले पहिले पाऊल आहे. आपणही मतदान करून आपल्या लोकशाहीची ताकद वाढवावी." - तेजस्विनी खोटेले, मतदार डोंगरगाव

"रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. चालता येत नाही. आमगाव येथे विरंगुळा केंद्रही नाही. फेरफटका मारायचा म्हटलं तर उद्यानेच नाहीत. सकाळी चालण्यासाठी मोकळी जागा नाही. स्थानिक नेत्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, एवढीच अपेक्षा आहे. मतदानातून चांगला आमदार निवडून देणे गरजेचे आहे." - अनिल पाऊलझगडे, मतदार, किडंगीपार

"मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. याबाबत खूप उत्सुकता आहे. जिल्ह्याचा विकास बघत आलोय, शिक्षणाविषयीच्या समस्या भेडसावत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. आम्हाला आमच्या समस्या सोडवणारे सरकार हवे आहे. त्यासाठी माझे मतदान आहे. तरुणांच्या हाताला काम देणारे सरकार हवे." - नरेश बोहरे, मतदार, रिसामा

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदिया