प्रवासी वाढले मात्र बसेस मोजक्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST2022-02-09T05:00:00+5:302022-02-09T05:00:07+5:30
कामावर असलेले कर्मचारी व काही कंत्राटी चालक-वाहक घेऊन बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने मोजक्याच व काही निर्धारित मार्गांवरच फेऱ्या सुरू आहेत. मात्र फेऱ्या सुरू झाल्याने आता प्रवासी बस स्थानकाची धाव घेत असून फेऱ्या मोजक्याच असल्याने त्यांची पंचाईत होत आहे. अशात आता प्रवासी बसफेऱ्या वाढविण्याची मागणी करीत आहेत.

प्रवासी वाढले मात्र बसेस मोजक्याच
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कर्मचारी आपले आंदोलन मागे घेण्यासाठी राजी नसून अशात आता महामंडळाने आहे त्या कर्मचाऱ्यांचा वापर करून तसेच कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी घेऊन बसफेऱ्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारानेही कामावर असलेले कर्मचारी व काही कंत्राटी चालक-वाहक घेऊन बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने मोजक्याच व काही निर्धारित मार्गांवरच फेऱ्या सुरू आहेत. मात्र फेऱ्या सुरू झाल्याने आता प्रवासी बस स्थानकाची धाव घेत असून फेऱ्या मोजक्याच असल्याने त्यांची पंचाईत होत आहे. अशात आता प्रवासी बसफेऱ्या वाढविण्याची मागणी करीत आहेत.
गोंदिया स्थानकावरून या मार्गावर धावताहेत बसेस
गोंदिया स्थानकातून सध्या गोंदिया ते नागपूर (तुमसर मार्गे) तसेच गोंदिया ते नागपूर (कोहमारा मार्गे) बसेस धावत आहेत. त्याचप्रकारे, तिरोडा आगारातून तिरोडा-गोंदिया तसेच तिरोडा-तुमसर-भंडारा अशा बसेस धावत आहेत.
प्रवाशांचा वैताग
सुमारे ३ महिन्यांनंतर आता कोठे एसटी रस्त्यावर उतरली आहे. मात्र त्यातही काही मोजक्याच फेऱ्या सुरू असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा काहीच फायदा मिळत नाही. संपूर्ण फेऱ्या सुरू होणार तेव्हाच सर्वसामान्य प्रवाशांची सोय होणार.
- राजेश देशमुख
आगारांनी बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र मोजक्याच फेऱ्या सुरू असून त्याही मुख्य मार्गावरील आहेत. अशात मात्र त्याव्यतिरीक्त अन्य मार्गांवर फेऱ्या सुरू न झाल्याने त्या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. आगाराने संपूर्ण फेऱ्या सुरू केल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.
- संजू टेकाम