शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी महावितरण अभियंत्यांच्या कानशिलात लगावली, कार्यालयात तणाव

By कपिल केकत | Updated: August 29, 2022 20:35 IST

ग्राहकाची जोडणी कापल्याचे प्रकरण : वीज अभियंता रामनगर पोलीस ठाण्यावर धडकले

गोंदिया : लगतच्या ग्राम मुर्री येथील एका ग्राहकाची वीजजोडणी कापली या प्रकरणाला घेऊन रागावलेल्या आमदार विनोद अग्रवाल यांनी ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश तमगाले यांच्या कानशिलात लगावली. सोमवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजता दरम्यान सूर्याटोला उपविभाग कार्यालयात ही घटना घडली. या घटनेनंतर समस्त वीज अभियंत्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याची मागणी केली.

वीज अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगतच्या ग्राम मुर्री निवासी लारोकर यांच्यावर ११,००० रुपयांचे वीजबिल असून यासाठी वीज अभियंता शुक्रवारी त्याच्याकडे गेले होते. यावर त्याने सोमवारी (दि.२९) बिल भरतो असे म्हणत वेळ मागितली. मात्र सोमवारी बिलाच्या रकमेतील ४००० रुपये भरतो व उर्वरित रक्कम नंतर भरणार असे म्हटले. यावर त्याची वीजजोडणी कापण्यात आली. या प्रकरणाला घेऊन आमदार अग्रवाल महावितरणच्या सूर्याटोला येथील उपविभाग कार्यालयात गेले व तेथे उपस्थित असलेल्या उपकार्यकारी अभियंत्यांना एक-दोन नव्हे तर तब्बल पाच झापड मारल्या.

या प्रकारामुळे संतापलेल्या वीज अभियंत्यांना लगेच रामनगर पोलीस ठाणे गाठून आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच या घटनेला घेऊन अभियंत्यांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, गुन्हा दाखल होतपर्यंत आंदोलन सुरू राहणार व त्यात दरम्यान काही समस्या आल्यास त्यासाठी जबाबदार राहणार नाही अशा इशारा दिला आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

टॅग्स :MLAआमदारmahavitaranमहावितरण